2021 मध्ये IT नियम लागू झाल्यानंतर, अनेक सोशल मीडिया आणि टेक कंपन्या दर महिन्याला तक्रार अहवाल जारी करतात. जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया साइट मेटा देखील दर महिन्याला हा अहवाल प्रसिद्ध करते. आता कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म WhatsApp साठी हा रिपोर्ट जारी केला आहे. मेटाने आपल्या अहवालात म्हटले आहे की एप्रिल 2024 मध्ये व्हॉट्सॲपची 71 लाख खाती बॅन करण्यात आली आहेत. ही कारवाई 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान झाली.
एप्रिलमध्ये 71,82,000 खाती करण्यात आली बंद
व्हॉट्सॲपने 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान एकूण 7,182,000 खाती बंद केली आहेत. कंपनी तिच्या प्लॅटफॉर्मवर संशयास्पद ॲक्टिव्हिटी ओळखण्यासाठी मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिटिक्स वापरत आहे. एप्रिलमध्ये, व्हॉट्सॲपला 10,554 युजर्सकडून तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यात अकाउंट सपोर्ट, बंदी शिफारस, प्रॉडक्ट सपोर्ट आणि सुरक्षिततेबद्दल तक्रारींचा समावेश होता.
का येते व्हॉट्सॲप अकाउंट्सवर बंदी
व्हॉट्सॲप खात्यांवरील बहुतेक बंदी धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल आहेत. तुम्ही कोणताही स्पॅम, घोटाळा किंवा चुकीची माहिती पसरवण्यात गुंतल्यास, तुमच्या खात्यावर बंदी घातली जाऊ शकते. याशिवाय तुम्ही स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास तुमचे खातेही बॅन केले जाऊ शकते. जर तुम्हालाही तुमच्या खात्यावर बंदी घातली जाऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या खात्यातून बनावट गोष्टी शेअर करू नये. याशिवाय मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवणे टाळावे.