‘फोर्स वन’ पोहोचण्याआधीच नगर पोलिसांनी केले ‘हे’ कठीण ऑपरेशन

हायलाइट्स:

  • पोलिसांनी सांगितला राहुरीतील अपहरणनाट्याचा थरार
  • आरोपी माजी पोलीस अधिकारी अखेर अटकेत
  • फोर्स वन येण्याआधीच पोलिसांनी केली कामगिरी फत्ते

अहमदनगर: घरात शस्त्रासह शिरलेल्या आरोपीने घरातील मुलीच्या डोक्यावर शस्त्र रोखून तिला ओलीस ठेवले होते. आपल्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घ्या, अशी त्याची मागणी होती. मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस अधिकारी असल्याने त्याला पोलिसांची कार्यपद्धती पुरेपूर माहिती होती. त्याच्या तावडीतून घरात अडकलेल्या कुटुंबाची सुरक्षित सुटका करणे आणि त्याला जेरबंद करणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दहशतवादी वापरतात, तशीच पद्धत त्याने अवलंबली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीपर्यंत सूत्रे हलली. अशी ऑपरेशन फत्ते करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘फोर्स वन’ ला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून ऑपरेशन फत्ते केले. (Hostage Drama in Ahmednagar)

राहुरी तालुक्यातील डिग्रज गावात गुरुवारी राबविण्यात आलेले हे कठीण ऑपरेशन नेमके कसे पार पडले, याचा तपशील आता समोर आला आहे. नाशिक विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते ही कामगिरी फत्ते करणाऱ्या पोलिस पथकाला बक्षिसे देण्यात आली. यावेळी शेखर आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या ऑपरेशनबद्दल माहिती दिली.

वाचा: विधानसभा निवडणुकीपूर्वीची आठवण सांगत शरद पवारांचा भाजपला इशारा

पुण्यातील बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सुनील लोखंडे (मूळ रा. नाव्हारा, ता. शिरूर) याने शस्त्रांसह ड्रिगजमधील एका घरात प्रवेश मुलीला ओलीस ठेवले होते. त्याला जेरबंद करण्यात यश आले असून त्याच्याकडून दोन गावठी शस्त्र आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. मात्र, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी कौशल्य आणि धैर्य या दोन्ही मार्गांचा वापर करावा लागला.

शेखर यांनी सांगितले की, या कुटुंबाशी आरोपी लोखंडे याचा व्यवहाराच्या निमित्ताने जुना परिचय आहे. लोखंडे इस्टेट एजंट आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्याविरुद्ध या महिलेने खंडणीसाठी धमकावल्याची फिर्याद दिली. ती मागे घेण्यासाठी त्याने हा नियोजनबद्ध गुन्हा केला. आरोपी रात्री या महिलेच्या घराबाहेर दबा धरून बसला होता. सकाळी कुटुंब जागे झाल्यानंतर मुलगा कचरा टाकण्यासाठी बाहेर गेला. त्याला पकडून डोक्याला शस्त्र लावत आरोपी घरात शिरला. याची माहिती मिळाल्यावर डीवायएसपी मिटके आणि राहुरीचे पोलिस आणि नंतर गुन्हे शाखेचे पोलिस तेथे गेले. आरोपी प्रशिक्षित पोलिस अधिकारी आणि त्याच्याकडे शस्त्र असल्याने त्याच्यापासून घरात अडकलेल्या कुटुंबीयांना धोका होता. त्यामुळे थेट झडप घालणे अशक्य होते. त्यामुळे त्याला बोलण्यात गुंतविण्यात आले. त्यावर तो दरवाजा उघडण्यास तयार झाला. मात्र, पोलिसांनी शस्त्रे बाहेर ठेवून आत यावे, अशी अट त्याने घातली. त्यानुसार पोलिसांनी ती मान्य करून मिटके, इंगळे आणि काही पोलिस आत गेले. आपल्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मागे घ्या, ही त्याची मागणी कायम होती.

वाचा: ‘महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढं कधी झुकला नाही आणि झुकणार नाही’

मधल्या काळात बारा वर्षांच्या मुलापेक्षा १४ वर्षांची मुलगी चपळ आणि हुशार असल्याचे लक्षात आल्यावर त्याने मुलाला सोडून तिला ओलीस धरले. पोलिसांनी त्याला खोटे खोटे आश्वासन देऊन पाहिले. मात्र, हा अधिकार तुम्हाला नाही, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद करून द्या, असे तो सांगत होता. मधल्या काळात त्याने पत्नीशी संपर्क केला. आपण येथे आलेलो असून जीवाला काही बरेवाईट झाले तर पोलिसांना सोडू नको. पोलिस अधिकाऱ्यांची नावे सांगत त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढत रहा, असेही त्याने पत्नीला सांगितले. मिटके यांनी त्या मुलीला सोडून दे, हवे तर माझ्यावर शस्त्र रोखून धर, असेही सांगून पाहिले. नंतर आरोपीचा पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून देण्याचे ठरले. मिटके यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना फोन लावून दिला. पाटील यांनीही आरोपीला समजावण्याचा प्रयत्न करीत बोलण्यात गुंतविले. एका क्षणी तो बेसावध झाला. ही संधी साधून मिटके यांनी मुलीला दूर होण्यास खुणावत आरोपी लोखंडे याच्यावर झडप घातली. त्याचा हात पकडून शस्त्राचे तोंड जमिनीकडे झुकविले. त्यामुळे लोखंडे याने चालविलेली गोळी जमिनीवर आदळली. तोपर्यंत बाकीच्या अधिकाऱ्यांनी झडप घालून आरोपीला जेरबंद केले आणि कुटुंबाची सुटका झाली.

वाचा: हा माणूसही त्यातलाच! समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांचा थेट हल्लाबोल

या ऑपरेशनकडे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष होते. स्वत: शेखर मुंबईतील वरिष्ठ अधिकारी आणि घटनास्थळावरील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. दहशतवादी अवलंबतात तशी या आरोपीची पद्धत असल्याने सुटकेसाठी ‘फोर्स वन’ला पाठविण्याचा निर्णय झाला होता. मात्र, तोपर्यंत नगरच्या पोलिसांनीच ऑपरेशन यशस्वी केले.

Source link

Ahmednagar Crime Newsahmednagar hostage dramaAhmednagar policeDigrasRahuriRahuri Hostage Dramaअहमदनगर पोलीसराहुरी
Comments (0)
Add Comment