Jyeshtha Amavasya 2024 : ज्येष्ठ अमावस्या कधी? जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि तिथी

Darsh Amavasya 2024 :

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की, हा दिवस पूजेसाठी खूप खास मानला जातो.

या अमावस्येनंतर आषाढ महिना सुरु होतो. पितरांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिक खास मानली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. यंदा ही अमावस्या ६ जून रोजी असणार आहे.

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. जाणून घेऊया ज्येष्ठ अमावस्येचा शुभ मुहूर्त, तिथी, पूजा पद्धत आणि महत्त्व

1. ज्येष्ठ अमावस्या तिथी

ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ५ जूनला ०७ वाजून ५४ मिनिटांनी सुरु होईल तर ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ६ जूनला ०६ वाजून ७ मिनिटांनी संपेल.

2. ज्येष्ठ अमावस्या शुभ मुहूर्त

६ जूनला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी नैवेद्य दाखवला जातो. हे तर्पण शुभ मुहूर्तावर केल्यास अधिक फलदायी ठरते. पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ११.३० ते दुपारी ०२.०४ पर्यंत असतो.

3. ज्येष्ठ अमावस्या महत्त्व

हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठाच्या अमावस्येला दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होतात. याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. तसेच या दिवशी गाय, कावळे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात.

4. ज्येष्ठ अमावस्या पूजा पद्धत

  • ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान करुन मंदिर स्वच्छ करा.
  • त्यानंतर भगवान विष्णूचा पंचामृताने अभिषेक करुन पिवळे चंदन अर्पण करा.
  • मंदिरात दिवा लावा, श्री विष्णू चालीसाचे पठण करा.
  • भगवान विष्णूची मनोभावे पूजा करा.
  • अमावस्या तिथीला सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. पितरांसाठी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. नदीच्या काळावर पितरांसाठी तर्पण करावे.
  • धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी चंद्राची पूजा करुन व्रत केल्याने रोगराई दूर होते. तसेच कामातील अडथळे दूर होतात.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Darsh Amavasya 2024Jyeshtha Amavasya 2024Jyeshtha Amavasya 2024 DateJyeshtha Amavasya 2024 ImportanceJyeshtha Amavasya 2024 Tithiज्येष्ठ अमावस्याज्योतिषशास्त्रदर्श अमावस्या
Comments (0)
Add Comment