Jyeshtha Amavasya 2024 : पितृदोषापासून मुक्ती हवीये? ज्येष्ठ अमावस्येला करा हे उपाय, अनेक अडचणींपासून होईल सुटका

Jyeshtha Amavasya 2024 Upay :

ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या सर्व सण आणि उत्सवांना विशेष महत्त्व आहे. या महिन्यात येणारे सण त्याचे महत्त्व अधिक वाढवतात. या महिन्यातील अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे.

वर्षभरात १२ अमावस्या साजरी केली जाते. या सर्वांचे स्वत:चे असे वेगळे महत्त्व आहे. या सर्वांमध्ये ज्येष्ठ महिन्यात येणारी अमावस्या तिथी अधिक महत्त्वाची मानली जाते, याच दिवशी शनि जयंती देखील असणार आहे.

धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला झाला होता. या दिवशी त्यांची उपासना केल्यास शुभ फल प्राप्त होते. तसेच ग्रह दोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. या काळात काही काम केल्याने प्रगतीतील अडथळे दूर होतात.

1. ज्येष्ठ अमावस्या २०२४ कधी?

ज्येष्ठ अमावस्या ५ जून रोजी सांयकाळी ७.५४ मिनिटांनी सुरु होईल. ६ जूनला सायंकाळी ६.०७ मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार ६ जून २०२४ ला ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाईल. या दिवशी स्नान दान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ०४. ०२ ते ०७.०७ पर्यंत असेल.

2. पितृदोष निवारण्यासाठी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी या गोष्टी करा

  • ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. पितरांसाठी सूर्यदेवाला जल अर्पण करा. यानंतर नदीच्या काठी पिंडदान तर्पण करावे. या दिवशी गोडाचा नैवेद्य पितरांना अर्पण केल्याने ते खुश होऊन प्रसन्न होतात.
  • ज्योतिषशास्त्राच्या मते पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी या दिवशी व्रत-उपवास करु शकता. तसेच पितृसुक्ताचे पठण या दिवशी करायला हवे. उपवास सोडताना ब्राह्मणाला भोजन द्यावे.
  • ज्योतिषशास्त्रानुसार पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळवी यासाठी गरीबांना, ब्राह्मणाला दक्षिणा दान करा.
  • ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं शुभ मानले जाते.
  • घरात सतत आजारपण येत असेल, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर पितरांची सेवा केल्याने अनेक अडचणींपासून सुटका होते.
  • ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरात बनवलेल्या जेवणाचा थोडा भाग पितरांच्या नावे काढून कावळ्याला, गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घाला.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Darsh Amavasya 2024Jyeshtha Amavasya 2024Jyeshtha Amavasya 2024 DateJyeshtha Amavasya 2024 ImportanceJyeshtha Amavasya 2024 TithiJyeshtha Amavasya Remediesज्येष्ठ अमावस्याज्येष्ठ अमावस्या उपायज्योतिषशास्त्रदर्श अमावस्यापितृदोष
Comments (0)
Add Comment