Vivo X100 Ultra कंपनीनं मे मध्ये लाँच केला होता. फोनच्या विक्रीचे अधिकृत आकडे Vivo नं शेयर केले आहेत. ज्यात दावा करण्यात आला आहे की Vivo X100 Ultra चा सेल सुरु होताच तासाभरात 62 ते 72 हजारांपर्यंत युनिट्स विकले गेले. फोननं विक्रमी कमाई केली आहे. कंपनीनुसार, फोननं या कालावधीत 50 कोटी युआन (जवळपास 6.9 कोटी डॉलर) ची कमाई केली.
Vivo X100 Ultra ची किंमत
Vivo x100 Ultra च्या 12GB रॅम व 256GB व्हेरिएंटची किंमत 6,499 चायनीज युआन (जवळपास 74,991 रुपये), 16GB रॅम व 512GB व्हेरिएंटची किंमत 7,299 चायनीज युआन (जवळपास 84,261 रुपये) आणि 16GB रॅम व 1TB व्हेरिएंटची किंमत 7,999 चायनीज युआन (जवळपास 92,278 रुपये) आहे. हा स्मार्टफोन टायटेनियम, व्हाइट आणि स्पेस ग्रे कलर्समध्ये लाँच करण्यात आला आहे.
Vivo X100 Ultra चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X100 Ultra मध्ये 6.78 इंचाचा कर्व्ड E7 AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. यात 3,000 निट्स पीक ब्राइटनेस आहे. फोन अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनरसह आला आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 16GB RAM आणि 1TB स्टोरेजसह पेअर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 आधारित OriginOS 4 वर चालतो.
Vivo X100 Ultra मध्ये Zeiss-ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मेन कॅमेरा 50 मेगापिक्सल सोनी LYT-900 चा 1 इंचाचा सेन्सर आहे, दुसरा 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे, तिसरी 200 मेगापिक्सल HP9 पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आहे. फ्रंटला 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80W वायर्ड आणि 30W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.