Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला करा या शक्तीशाली मंत्रांचा जप, शनिदेव होतील प्रसन्न; बिघडलेली कामे होतील पूर्ण

Powerful Mantra of Shani Dev :

हिंदू पंचागानुसार शनि जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शनिदेवाला न्यायाचा आणि कर्माचा देव मानले जाते. असे म्हटले जाते की, शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ प्रदान करते.

चांगले कर्म करणाऱ्यांवर शनिदेवाचा आशीर्वाद राहातो आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर त्यांचा प्रकोप होतो. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला होता असे पौराणिक ग्रंथात सांगितले आहे. त्यामुळे हा दिवश शनि जयंती म्हणून ओळखला जातो.

यंदा शनि जयंती ही ६ जून ला साजरी केली जाणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी ५ जूनला संध्याकाळी ७ वाजून ५४ मिनिटांनी सुरु होईल तर ६ जूनला संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांनी संपेल. शनीच्या ढैय्येचा किंवा साडेसातीचा त्रास होत असेल तर शनि जयंतीला शनिदेवाची मनोभावे पूजा करावी. तसेच काही उपाय करुन पाहा.

1. शनि जयंतीला करा हे उपाय

शनि जयंतीला शनिदेवाची विशेष पूजा केली जाते. पूजेच्या वेळी शनिदेवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करा. शनिदेवाला काळे तीळ, तिळापासून बनवलेले पदार्थ, काळे-निळे वस्त्र आणि निळी फुले अर्पण करा. तसेच शमीची पाने देखील अर्पण करावीत. ऊँ शम शनैश्चराय नम: या मंत्राचा मनोभावे १०८ वेळा जप करावा.

2. शनि दोष कमी करण्यासाठी मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पिताये शन्योराभिश्रवंतु ना
ऊँ शम शनैश्चराय नम: ।

3. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मंत्र

अपराधसहस्त्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर।।
गतं पापं गतं दु:खं गतं दारिद्रय मेव च।
आगता: सुख-संपत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्।।

4. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी मंत्र

ॐ शनि शनिस्चराये नमः
नीलांजना समाभासं रविपुत्रम यमराजन,
छाया मार्तंड संभुतम,
तम नमामि शनैश्चरम

5. शनि दोष कमी करण्यासाठी मंत्र

ओम त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम।
उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात।।
ओम शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शंयोरभिश्रवन्तु नः।
ओम शं शनैश्चराय नमः।।

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Powerful Mantra of Shani DevShani Jayanti 2024Shani Jayanti 2024 Mantraशनि जयंतीशनिदेवसाडेसाती
Comments (0)
Add Comment