वृत्तसंस्था, देहरादून : लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने २०१४, २०१९ नंतर आता २०२४मध्ये उत्तराखंडमधील पाचही जागा जिंकून हॅट्ट्रिक केली आहे. या राज्यात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होती. मागील दोन्ही निवडणुकीसह २०२४च्या निवडणुकीतही काँग्रेसला येथे खाते उघडता आले नाही.या राज्यात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी निवडणूक झाली. भाजपने येथे आपले जुने उमेदवार बदलवून दोन नव्या उमेदवारांना संधी दिली होती. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांच्या हरिद्वार मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी अनिल बलुनी यांना माजी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या जागेवर गढवाल येथून उमेदवारी दिली होती. हे दोन नवे उमेदवार काय कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या दोघांनीही जागा राखल्या. त्याचप्रमाणे टिहरी गढवाल येथून माला राज्यलक्ष्मी शहा, अलमोरा येथून अजय टमटा व नैनिताल उधमसिंग येथून अजय भट्ट यांनी विजय मिळविला.
भाजपने येथे आपले धार्मिक कार्ड पुढे करीत काँग्रेसच्या सर्वच मुद्द्यांवर मात केली. यासोबतच भाजपने येथे जातीय समीकरणांवरही भर दिला होता. ठाकूर व ब्राह्मण या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आल्याने त्याचा परिणाम पुन्हा एकदा भाजपच्या पाचही जागा जिंकण्यात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सभा व रॅलींचा धडाका लावला. काँग्रेसकडून राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनीही जोरदार प्रचार केला. मात्र त्यांना अपेक्षित परिणाम साध्य करता आला नाही.

ठळक मुद्दे
-दोन नवे मतदारांची दमदार कामगिरी
-भाजपचे धार्मिक कार्ड पुन्हा यशस्वी
-सिलक्यारा बोगद्याचा मुद्दा निष्प्रभ
-स्थानिक मुद्यांचा विशेष प्रभाव नाही
एकूण जागा ५
२०१९
भाजप-५
काँग्रेस-०
२०२४
भाजप-५
काँग्रेस-०