iQOO 13 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
डिजिटल चॅट स्टेशननं स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 चिपसेटवर आधारित आगामी iQOO फ्लॅगशिप फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला आहे. टिपस्टर स्टँडर्ड IQOO 13 बाबत माहिती देत असल्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा:
याआधी लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की iQOO 13 चा डिस्प्ले 1.5K रेजॉल्यूशनला सपोर्ट करेल तर 13 Pro चा डिस्प्ले 2K रेजॉल्यूशनसह येईल. तसेच नवीन लीक मधून समजलं आहे की iQOO 13 मध्ये IP68-रेटेड फ्रेम असेल. तसेच यात एक फ्लॅट OLED डिस्प्ले मिळेल जो 2K रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनरसह देखील येईल.
जेव्हा टिप्सटरला विचारलं गेलं की तो iQOO 13 आणि 13 Pro बाबत माहिती देत आहे का? तेव्हा उत्तर मिळालं की हे स्पेसिफिकेशन्स मिळाले तर प्रो मॉडेल येणार नाही. विशेष म्हणजे याआधीचे प्रो मॉडेल म्हणजे iQOO 12 Pro, 11 Pro, 10 Pro इत्यादी चीनच्या बाहेर लाँच झाले नाहीत. त्यामुळे असं वाटत आहे की 13 Pro चीनमध्ये देखील सादर होणार नाही.
इतर स्पेसिफिकेशन्स पाहता, आधीच्या रिपोर्ट्सनुसार, iQOO 13 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज दिली जाऊ शकते. यात 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी मिळू शकते. तसेच हा आगामी फ्लॅगशिप फोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल, तसेच iQOO 13 यावर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच होऊ शकतो.