भूतानचे पंतप्रधान काय म्हणाले ?
भुतानचे पंतप्रधान ल्योनचेन यांनी ट्विट केले आहे ते म्हणाले कि “जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत सलग तिसरा विजय मिळवल्याबद्दल माझे मित्र नरेंद्र मोदीजी आणि NDA यांचे अभिनंदन. ते भारताला नव्या उंचीवर घेऊन जात असताना दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करेन.”
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल काय म्हणाले ?
पंतप्रधान पुष्प कमल दहल म्हणाले कि, “लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या सलग तिसऱ्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. जगातील सर्वात मोठा लोकशाही उपक्रम यशस्वी करण्यात भारतातील जनतेचे मोठे योगदान आहे.”
श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे काय म्हणाले ?
रानिल विक्रमसिंघे म्हणाले कि, “भाजपच्या नेतृत्वाखालील NDA चे विजयाबद्दल मनापासून अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जनतेने प्रगती आणि समृद्धी साधण्याचा विश्वास दाखवला आहे. भारत हा आमचा शेजारी असल्याने श्रीलंका भारताशी सहकार्य वाढवण्यावर भर देईल.”
मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जुगनाथ यांनीही दिल्या शुभेच्छा
प्रवीण कुमार जुगनाथ म्हणाले कि, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. सर्वात मोठी लोकशाही तुमच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व प्रगती करेल.भारत आणि मॉरिशस यांच्यातील संबंध अबाधित राहू द्या हीच अपेक्षा. ”
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या ?
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया यांनी देखील ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या कि, “नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. तसेच त्यांना पुढील भविष्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे की इटली आणि भारत यांच्यातील मैत्री दृढ करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत राहू.”