Narendra Modi: मोदी कमकुवत होतील, असा स्वप्नात देखील विचार करू नका! २०१४, २०१९ला मागे टाकणारी ठरेल तिसरी टर्म

नवी दिल्ली : राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जींपर्यंतच्या विरोधकांनी भाजपला बहुमत मिळवता न येणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने मिळून भाजपने जवळपास तितक्या जागा जिंकल्या नाहीत. विरोधकांकडून हा मोदींचा पराभव असल्याचे बोलले जात आहे कारण एनडीएचा प्रचार प्रामुख्याने मोदींभोवती केंद्रित होता.याला अपवाद टीडीपीचा म्हणावा लागले. मोदींच्या झंजावाती प्रचारामुळे त्यांची वैयक्तीक जबाबदारी वाढवण्याचे काम केले.

आता निकालानंतर मोदी पहिल्यांदाच आघाडी सरकारचे नेतृत्व करणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ स्पष्ट बहुमतासह मजबूत सरकार चालवण्याचा होता. पंतप्रधान असतानाही त्यांनी एक दशक पूर्ण बहुमताने राज्य केले. आता आघाडी सरकार चालवताना त्यांच्यासमोर मजबूत आणि जोशात असलेला विरोधी पक्ष असेल, ज्याचा त्यांना सामना करावा लागले. त्याच बरोबर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांसारख्या मित्रपक्षांच्या मागण्यांना सामोरे जावे लागेल.
Lok Sabha Election 2024 Full Result: १८व्या लोकसभेत कोणाला किती जागा? मतमोजणी पूर्ण, असे आहे प्रत्येक पक्षाचे संख्याबळ; जनतेने भाजपचे बळ कमी केले

भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नसलं तरी, केंद्रात सलग दशकभर सत्ता राखणं हा एक महत्त्वाचा पराक्रम आहे. अनेक सत्ताधारी पक्ष केवळ स्वप्न पाहू शकतात, अशी ही कामगिरी आहे. जवाहरलाल नेहरूंनंतर तिसरा टर्म मिळवणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असतील आणि भलेही त्यांची तिसरी टर्म ही आघाडी सरकारची असली तरी.मात्र मोदींचे यश हे अधिक मोठे मानले जाऊ शकते कारण सध्याच्या राजकारणात त्यांनी हे यश मिळवले आहे. तुलनेत नेहरुंना महात्मा गांधींचा आशीर्वाद होता आणि स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचे भावनिक संबंध होते. इतकेच नाही तर ते अशा एका पक्षाचे नेतृत्व करत होते ज्याचा जन्म स्वातंत्र्य लढ्यासाठी झाला होता.

2024 च्या निवडणुकांबद्दल बोलायचे झाले तर 240 जागा मिळवणे हे दावा करण्यात आलेल्या 400-अधिक जागांपेक्षा फारच कमी आहे. 1984नंतर कधीच काँग्रेस किंवा बिगर भाजप पक्षांना इतक्या जागा मिळवता आल्या नाहीत. 1984 नंतर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसने जबरदस्त विजय मिळविल्यानंतर हा निकाल कोणत्याही गैर-भाजप पक्षासाठी सर्वोत्तम आहे. अर्थात निवडणूक प्रचारात महागाई आणि बेरोजगारी या सारख्ये मुद्दे धोक्याचा इशारा म्हणून समोर आले होते, मात्र भाजपने त्यांना कमी लेखले.
Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भूकंप; भाजपच्या आमदारांच्या मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड

प्रत्यक्षात मोदींनी महागाई नियंत्रणात आणली असली तरी, भाजपला मतदारांकडून अशी अपेक्षा होती की ते महागाईचा जागतिक स्तरावरील गोष्टीचा विचार करून मत देतील. मोदींनी सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि रोजगार निर्मितीवर भर दिला. सरकारला वाटले की करोनानंतर केंद्रीय स्तरावरील नोकऱ्यांची भरती ही याबाबतची चिंता कमी करण्यास मदत करेल. मात्र ते कमी पडले. अंतर्गत सर्व्हे आणि कॅडर फिडबॅकनंतर देखील विद्यमान खासदारांना संधी देण्याची चूक भाजपला टाळता आली असती.

२०२४ साठी ४०० हून अधिक जागा हा सामर्थ्य आणि आत्मविश्वासाचा संदेश देणारा होता. पण हा डाव उटला पडला. विरोधकांनी घटना बदलण्याचा केलेला प्रचार यावर मोदींनी दिलेले उत्तर समाधानकारक नव्हते. आता जागा गमावल्याने मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी आव्हान निर्माण झाले आहे. एक मजबूत विरोधकांसोबत मोदींना एन. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांसारख्या मित्रपक्षांना संभाळावे लागणार आहे. आणि हीच गोष्ट भाजपच्या अजेंडा पूर्ण होण्यास अडथळा ठरू शकते. आरएसएस देखील या गोष्टीवर लक्ष ठेवेल की भाजप मित्रपक्षांना कसा हाताळतो.

अर्थात परिस्थिती कशी ही असो मोदींसाठी संघर्ष नवा नाही. त्यांची संपूर्ण राजकीय करिअर हे आव्हानांना योग्य पद्धतीने हाताळणे आणि योग्य वेळी त्यांना सामोरे जाण्याचा राहिला आहे. त्यामुळे कमकुवत असून देखील ते अशा ताकतीने पुढे जातील त्याचा दावा फार कमी लोक सध्याच्या घडीला करतील. भाजपची संख्या भले ही कमी झाली असो. पण या काळात देखील त्यांनी आपली निष्ठा आणि विश्वासार्हता टिकवली आहे. यामुळेच भाजप विरोधकांच्या जातीच्या कार्डचा यशस्वीपणे मुकाबला करू शकली.

कट्टर राष्ट्रवाद ही मोदींची आणखी एक जमेजी बाजू आहे आणि त्यांच्या नेतृत्वात सार्वजनिक पायाभूत गोष्टींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मजबूत राजकोष हे मोदींचे आणखी एक बलस्थान आहे. मोदींची तिसरी टर्म नेहमी लक्षात ठेवली जाईल यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतील, त्यांची कामगिरी लक्षात राहावी यासाठी मोदी प्रयत्नशील असतील.

मोदींचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता, आव्हाने होती म्हणून कामगिरी करता आली नाही असे कारण ते देणार नाहीत. तिसऱ्या कार्यकाळात मोदी २०२४ आणि २०२९चे यश मागे टाकणारी कामगिरी करतील. ज्यामुळे गेल्या १० वर्षातील यश देखील छोटे वाटेल. आघाडी सरकारचे कर्णधार म्हणून मोदी कमकूवत होतील ही भविष्यवाणी करणे घाईचे ठरेल. गेल्या दोन टर्ममध्ये मोदींनी मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते. अशा प्रकारचा जनादेश आला तर त्याला सामोरे जाता येईल, यासाठीच कदाचित तो निर्णय घेतला असावा.

Source link

coalition governmentNarendra Modiwill narendra modi become weakनरेंद्र मोदीलोकसभा निवडणूकलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment