‘जाट’ समाजाचा संताप, काँग्रेसने साधली संधी, अन् ‘या’ राज्यांमध्ये झालं भाजपचं मोठं नुकसान

मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला २९२ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. तसेच या निवडणुकीत २४० जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. पक्षाने हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जाट समाजाचे वर्चस्व असणाऱ्या जागा गमावल्या आहेत. भाजपला जाट समाजातील लोकांचा रोष महागात पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

राजस्थानमध्ये काय झालं ?

राजस्थान, चुरू, सिकर आणि झुंझुनू येथे जाटांचे वर्चस्व असलेल्या तीन जागांवर इंडिया आघाडीने भाजपची कोंडी केली. काँग्रेसचे राहुल कासवान यांनी भाजपचे देवेंद्र झाझरिया यांचा पराभव केला. कासवान यांना ७ लाख २८ हजार इतकी तर झझारिया यांना ६ लाख ५५ हजार मते मिळाली. इंडिया आघाडीने सीकर मतदारसंघातून सीपीएमचे ज्येष्ठ नेते अमर राम यांना उमेदवारी दिली. यामध्ये अमरा राम यांनी भाजपच्या सुमेधानंद सरस्वती यांचा ७२ हजार मतांनी पराभव केला. यामध्ये अमर राम यांना ६ लाख ५९ हजार तर सरस्वती यांना ५ लाख ८६ हजार मते मिळाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ब्रिजेंद्र सिंग ओला यांनी झुंझुनू मतदारसंघात विजय मिळवला. ओला यांना ५ लाख ५३ हजारांहून अधिक मते मिळाली, तर भाजपचे शुभकरन चौधरी यांना ५ लाख ३४ हजार मते मिळाली.

हरियाणामध्ये काय झालं ?

हरियाणातही, इंडिया आघाडीने जाटांचे वर्चस्व असलेल्या रोहतक, हिसार आणि सोनीपत या तीन जागा भाजपकडून हिसकावून घेतल्या. रोहतकमध्ये काँग्रेसचे दीपेंद्र सिंग हुडा यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. हुड्डा यांना ७ लाख ८३ हजारांहून अधिक मते मिळाली. तर भाजपचे अरविंद कुमार शर्मा यांना ४ लाख ३८ हजार मते मिळाली.
चंद्राबाबूंचा नाय भरवसा, पाठिंबा देण्याच्या बाबतीत आहे रिकॉर्ड तसा ‘नकोसा’

चर्चेत असणारा हिस्सारचा गड काँग्रेसने घेतला

दरम्यान, निवडणुकीपूर्वी हिस्सारच्या जागेबाबत बरीच चर्चा झाली होती. ती जागा काँग्रेसचे जय प्रकाश यांनी ६३ हजारांहून अधिक मतांनी जिंकली. जयप्रकाश यांना ५ लाख ७० हजारांहून अधिक मते मिळाली, तर भाजपच्या रणजित सिंह यांना सुमारे ५ लाख ७ हजार मते मिळाली. या जागेवर दोन प्रमुख जाट नेत्या सुनैना चौटाला आणि नैना सिंह चौटाला यांना विशेष असं काही करता आले नाही. INLD च्या सुनैना आणि JJP च्या नैना या दोघींना प्रत्येकी २२ हजार मते मिळाली. सोनीपतच्या जागेवर काँग्रेसचे सतपाल ब्रह्मचारी यांनी २२ हजार मतांनी विजय मिळवला. ब्रह्मचारी यांना ५ लाख ४८ हजारांपेक्षा थोडी जास्त मते मिळाली, तर भाजपचे मोहनलाल बडोली यांना ५ लाख २६ हजार मते मिळाली

उत्तरप्रदेशमधील ३ जागा इंडियाने हिसकावल्या

इंडिया आघाडीने पश्चिम उत्तर प्रदेशातील तीन जाट बहुल जागा, कैराना, मुझफ्फरनगर आणि रामपूर भाजपकडून हिसकावून घेतल्या. कैरानामधून समाजवादी पक्षाच्या इक्रा हसन चौधरी यांनी भाजपच्या प्रदीप कुमार यांचा पराभव केला. इक्राला ५ लाख २८ हजारांहून अधिक मते मिळाली, तर प्रदीप कुमार यांना ४ लाख ५८ हजार इतकी मते मिळाली. केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांचा मुझफ्फरनगरमधून समाजवादी पक्षाच्या हरेंद्र सिंह मलिक यांच्याकडून पराभव झाला. संजीव बालियान यांना ४ लाख ४६ हजारांपेक्षा थोडी जास्त तर हरेंद्र मलिक यांना ४ लाख ७० हजारांहून अधिक मते मिळाली. तर रामपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे मोहिबुल्ला विजयी झाले. मोहिबुल्ला यांना ४ लाख ८१ हजारांहून अधिक मते मिळाली.घनश्याम सिंह लोधी बसले होते. लोधी यांना ३ लाख ९४ हजार मते मिळाली.

Source link

BJP LossHaryana Electionsindia allianceLok Sabha Election Result 2024loksabha election 2024Rajasthan Electionsजाटजाट समाजजाट समाज न्यूज
Comments (0)
Add Comment