भाजप बहुमतापासून दूर, शिंदेंच्या मागण्या भरपूर; महाशक्तीकडे किती मंत्रिपदं मागितली?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या ६३ जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे आता केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला एनडीएतील मित्रपक्षांची गरज भासेल. त्यामुळे १० वर्षांनंतर प्रथमच घटक पक्षांचा भाव वधारला आहे. मित्रपक्षांनी भाजपसमोर केंद्रातील पाठिंब्याच्या बदल्यात विविध मागण्या करण्यास सुरुवात केली आहे.

बिहारमध्ये लोकसभेच्या १२ जागा जिंकणाऱ्या संयुक्त जनता दलानं ३ कॅबिनेट मंत्रालयांची मागणी केली आहे. महाराष्ट्रात ७ जागा जिंकणाऱ्या शिंदेसेनेनं १ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदं मागितली आहेत. बिहारमध्ये ५ जागांवर विजय मिळवणाऱ्या चिराग पासवान यांच्या पक्षानं १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद मागितलं आहे. एक जागा जिंकणाऱ्या हिंदुस्तानी आवाम मोर्चानंदेखील मोदी सरकारमध्ये १ कॅबिनेट मंत्रिपद मागितलं आहे.
PM Modis Swearing In Ceremony: आता मोदी नव्हे, NDA सरकार; दिल्लीत हालचाली जोरदार; सूत्रं हलली, शपथविधीची तारीख ठरली?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिडीपीसह अन्य सहकारी मित्रपक्षांनीदेखील भाजपकडे मागण्या केल्या आहेत. सर्वात मोठी मागणी १६ जागा जिंकणाऱ्या टिडीपीकडून होणार आहे. त्यांच्याकडून लोकसभेच्या अध्यक्ष पदावर दावा केला जाणार आहे. टिडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू ५ ते ६ किंवा त्याहून अधिक मंत्रिपदं मागू शकतात. लोकसभेच्या अध्यक्षपदासह रस्ते वाहतूक, ग्रामविकास, आरोग्य, कृषी, जलशक्ती, माहिती आणि प्रसारण मंत्री, शिक्षण आणि अर्थ राज्यमंत्रिपदांची मागणी टिडीपीकडून केली जाऊ शकते.

लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या आहेत. मित्रपक्षांसह भाजपचा आकडा २९२ वर जातो. सत्ता स्थापनेसाठी २७२ खासदारांचा पाठिंबा गरजेचा असतो. टिडीपीनं १६, जेडीयूनं १२ जागा जिंकल्यानं भाजपसाठी या दोन पक्षांचा पाठिंबा सर्वात महत्त्वाचा आहे. ७ खासदार असलेली शिंदेसेना, ५ जागा जिंकणारी एलजेपी (रामविलास), २ जागा जिंकणारी जेडीएस यांचीही भूमिका सत्तास्थापनेत महत्त्वाची असेल.

Source link

bjpEknath ShindeLok Sabha Election Result 2024shiv senaएकनाथ शिंदेभाजपलोकसभा निवडणूक २०२४शिवसेना
Comments (0)
Add Comment