JDU, TDP ने संधी साधली! सरकार स्थापनेसाठी भाजपसमोर ‘या’ अटी, गडकरींच्या खात्यावरही डोळा?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला एकट्याने बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही. एनडीएकडे बहुमत असले तरी भाजपकडे बहुमत नसल्याने मित्रपक्ष टीडीपी आणि जेडीयूचं वजन वाढलं आहे. दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं मानलं जात असलं तरी सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत दोन्ही पक्ष आता भाजपसमोर अटी ठेवू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही पक्षांनी भाजपकडून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी दबावाचे राजकारण सुरू केले आहे. त्यात रस्ते परिवहन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यावर भाजपला पाणी सोडावं लागण्याती शक्यता आहे.

नितीश कुमार एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आले आहेत. विशेष म्हणजे ज्या विमानाने नितीश कुमार दिल्लीला आले त्याच विमानात विरोधी पक्षातील इंडिया आघाडीचे तेजस्वी यादवही होते. या दोघांनी एकत्र विमानाने प्रवास केल्याने एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांनाही धडकी भरली. दुसरीकडे, टीडीपी नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही येत दिल्लीत येणार आहेत.

एनडीए आघाडी अंतर्गत भाजपला नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली तिसऱ्यांदा सरकार बनवायचे असेल, तर टीडीपी आणि जेडीयूच्या अटी त्यांना मान्य कराव्या लागतील आणि त्यासाठी दोन्ही पक्षांनी आता दबावाचे राजकारण सुरू केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीडीपी केंद्र सरकारमध्ये ५-६ मंत्रालयं आणि लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करू शकते.

तर नितीश कुमार हे देखील एनडीए सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी लोकसभेचे अध्यक्षपद आणि अनेक मंत्रीपदांची मागणी करू शकतात. विशेष म्हणजे, अलीकडेच सूत्रांनी असा दावा केला होता की, इंडिया आघाडीने नितीश कुमार यांना उपपंतप्रधानपदाची ऑफर दिली. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दिल्लीत आज एनडीएच्या सर्व घटक पक्षांची बैठक होणार आहे. त्यामुळे जेडीयू आणि टीडीपी आपल्या अटी भाजपसमोर ठेवू शकतात. टीडीपी भाजपकडून जलशक्ती, शिक्षण आणि रस्ते वाहतूक मंत्रालय यासारख्या पदांची मागणी करू शकते, अशी माहिती आहे.

Source link

Chandra babu naidulok sabhaLok Sabha Election 2024 resultslok sabha nivadnuk nilak 2024Lok Sabha Results NDA Government Formationnitish kumarअमित शहाएनडीए सरकार स्थापनचंद्राबाबू नायडूनरेंद्र मोदीनितीश कुमार
Comments (0)
Add Comment