Shani Jayanti 2024 : या ५ राशींवर पुढील वर्षभर राहाणार शनिचा प्रभाव! अपयशाचा सामना; कामात अडथळे येतील

Shani Jayanti Rashifal :

६ जूनला ज्येष्ठ अमावस्या असून शनि जयंती आहे. शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला झाला होता. त्यामुळे नऊ ग्रहांपैकी एक असणाऱ्या शनिदेवाची पूजा केली जाते.

शनिदेवाला न्याय आणि कर्माचा देवता म्हटले गेवे आहे. असे मानले जाते की, शनिदेव प्रत्येक व्यक्तीचा निर्णय त्याच्या कर्मावरुन ठरवतात. ज्योतिषशास्त्रात शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाचा प्रभाव मेष ते मीन राशीपर्यंत कसा राहिल. जाणून घेऊया पुढील वर्षभर कोणत्या राशी भाग्यवान ठरतील, कोणाला करावा लागेल अधिक संघर्ष पाहूया

1. मेष – व्यवसायात प्रगती

व्यवसायात वाढ आणि कामात काही प्रमाणात यश मिळेल. या राशीवर शनिच्या नकारात्मक प्रभावामुळे प्रगतीत अडचणींचा सामना करावा लागेल. शनिच्या मंगळाच्या विशेष शत्रू राशीमुळे जवळच्या नातेवाईकांकडून तणाव आणि रागाच्या समस्या वाढतील.

2. वृषभ – संघर्षानंतर यश मिळेल.

वृषभ राशीला संघर्ष आणि कठोर परिश्रम केल्यानंतर उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील. या काळात उत्पन्नाच्या संधी देखील मिळतील परंतु, तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकणार नाही. हळूहळू परिस्थिती सुधारेल. या काळात अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होतील. जमिन, वाहन इत्यादी सुखांमध्ये वाढ होईल.

3. मिथुन – कामात अडथळे येतील

मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात कुटुंबामध्ये तणाव आणि दूरावा येईल. या काळात तुम्हाला जवळच्या लोकांसोबत तणावाचाही सामना करावा लागेल. या राशीत शनी ग्रह आल्यामुळे सहकाऱ्यांसोबत वैचारिक मतभेद होतील. ऑक्टोबरनंतर रखडलेल्या कामांना यश मिळेल.

4. कर्क – लोकांचा खर्च वाढेल

कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या कामात अनावश्यक खर्च आणि अडथळे येतील. या काळात तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिक समस्यांनाही तोंड द्यावे लागेल. कौटुंबिक वाद, शारीरिक त्रास आणि अपघात यापासून सावध राहा. काही काळानंतर आर्थिक स्थिती सुधारु शकते. प्रवासही घडेल

5. सिंह – संघर्ष वाढेल.

शनीच्या प्रभावामुळे मानसिक तणाव आणि क्रोध वाढेल. नोकरी-व्यवसायात वाद आणि नुकसान होऊ शकते. आर्थिक नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे. कामात अडथळे येतील. शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करेल. धैर्याने काम करा.

6. कन्या – कामात अपयश येईल

शनिच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना संघर्षाला सामोरे जावे लागेल. कामातील अडथळे वाढतील ज्यामुळे अपयश येईल. कामासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले होतील.

7. तुळ – आरोग्याची काळजी घ्या

तुळ राशीच्या लोकांना व्यवसायात अस्थिरतेचा सामना करावा लागेल. घरामध्ये संकटाची परिस्थती राहिल. शनीच्या प्रभावामुळे या लोकांना आर्थिक फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या

8. वृश्चिक – शनिचा प्रभाव राहिल

वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीच्या ढैय्याचा प्रभाव राहिल. नोकरी-व्यवसायातही लवकरच बदल होतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. संघर्ष केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. मित्रांसोबत मतभेद होतील

9. धनु – मानसिक तणाव वाढेल

धनु राशीच्या लोकांना शुभ परिणाम दिसून येतील. कठीण समस्येत उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील. शनिच्या प्रभावामुळे मानसिक तणाव आणि अपेक्षा भंगही कायम राहिल. मुलांशी संबंधित काळजी वाढेल. खर्च देखील अधिक होईल.

10. मकर – साडेसातीचा प्रभाव

शनिच्या साडेसातीचा मकर राशीवर अशुभ परिणाम पाहायला मिळेल. कुटुंबाकडून अडचणींचा सामना करावा लागेल. आईला त्रास होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या मेहनतीमुळे तुमच्या योजना पूर्ण होतील.

11. कुंभ – कुटुंबात शुभ कार्य होतील

कुंभ राशीच्या लोकांना तणावाचा सामना करावा लागू शकतो. जवळच्या मित्रांमध्ये त्रासाला सामोरे जावे लागेल. व्यवसायातील अडथळ्यांमुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. शारीरिक वेदनामुळे तुमची चिंता वाढेल. कुटुंबात अनेक शुभ कार्य होतील.

12. मीन – लोकांच्या मनोकामना पूर्ण होतील.

मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहिल. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात मोठे उलथापालथीचे प्रसंग येतील. शनिच्या प्रभावामुळे संघर्ष आणि अडचणींना सामोरे जावे लागू शकते. इच्छा पूर्ण होतील. वाईट कामांमध्ये सुधारणा होऊन अचानक आर्थिक लाभाच्या संधी मिळतील

Source link

Luckiest Zodiac SignMoney Benefitsshani jayantiShani Jayanti 2024 RashifalShash Rajyogधनलाभ होणार का?नोकरी मिळणार का?शनि जयंतीशश राजयोग
Comments (0)
Add Comment