फक्त खास ग्राहकांसाठी OnePlus चा सेल; अशाप्रकारे स्वस्तात मिळवा OnePlus 12, 12R, OnePlus Open

स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus चा कम्युनिटी सेल या आठवड्यात भारतात सुरु होईल. यात कंपनीच्या OnePlus 12, 12R, OnePlus Nord CE 4 आणि OnePlus Open वर जबरदस्त डिस्काउंट देण्यात येईल. या सेलमध्ये OnePlus Pad, Watch 2 आणि Buds Pro 2 वर देखील डिस्काउंट दिला जाईल.

OnePlus चा कम्युनिटी सेल 6 ते 11 जून पर्यंत चालेल. यात कंपनीच्या ऑनलाइन स्टोर, ई-कॉमर्स साइट Amazon आणि ऑफलाइन स्टोर्सवर कमी किंमतीत स्मार्टफोन्स खरेदी करता येतील. तसेच ग्राहकांना बँक डिस्काउंटचा देखील फायदा मिळू शकतो. त्यामुळे प्रोडक्ट्स सेल मध्ये आणखी कमी किंमतीत विकत घेता येतील.
पहिल्यांदाच इतक्या स्वस्तात मिळत आहे OnePlus 11R; पुन्हा मिळणार नाही अशी डील

या सेलमध्ये OnePlus 12 चा या महिन्यात लाँच झालेला Glacial White कलर व्हेरिएंट 3,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकला जात आहे, सोबत 2,000 रुपयांचा कुपन डिस्काउंट देखील मिळत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 64,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा Sony LYT-808 सेन्सर आहे. तसेच 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 64 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा 3x ऑप्टिकल झूमसह देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यातील 5,400mAh ची बॅटरी 100 W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

या सेलमध्ये OnePlus 12 खरेदी केल्यास 12,000 रुपये पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि OnePlus 12R वर 6,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. या सेलमध्ये कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन OnePlus Open वर 5,000 रुपये पर्यंतचा बँक डिस्काउंट उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना OnePlus Watch 2 मोफत मिळेल.

OnePlus 12R 39,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनवर 2,000 रुपयांचा कुपन डिस्काउंट आणि 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच कर्व्ड ऐज असलेला AMOLED डिस्प्ले 1.5K पिक्सल के रिजॉल्यूशन आणि 120 Hz के रिफ्रेश रेटसह आहे. कंपनीनं यासाठी तीन अँड्रॉइड ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सिक्योरिटी अपडेट उपलब्ध करण्याची माहिती देण्यात आली आहे. OnePlus Nord CE 4 वर 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जाईल. OnePlus Pad आणि OnePlus Pad Go खरेदी केल्यास 3,000 रुपयांचा डिस्काउंट कुपन मिळत आहे. या सेलमध्ये OnePlus Watch 2 आणि OnePlus Buds 2 Pro देखील कमी किंमतीत विकत घेता येईल.

Source link

community saleOnePlusoneplus community saleoneplus mobileवनप्लसवनप्लस कॉम्युनिटी सेलवनप्लस डिस्काउंटवनप्लस सेल
Comments (0)
Add Comment