डिलिव्हरी दरम्यानच्या चुका कमी करण्यासाठी आता ॲमेझॉन एक खास आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल वापरत आहे. या उपकरणाचे नाव आहे प्रोजेक्ट पी.आय. आहे. यामध्ये पी.आय. म्हणजे “प्रायव्हेट इन्व्हेस्टीगेटर “. हे तंतोतंत डिटेक्टिव्हसारखे काम करते आणि सामान स्कॅन करून कोणत्याही प्रकारचे दोष शोधते.
ॲमेझॉनचे वर्ल्डवाईड सेलिंग पार्टनर सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष धर्मेश मेहता म्हणाले, “आमच्या ऑपरेशन्स सुविधांमध्ये एआय आणि उत्पादन इमेजिंगचा वापर करून, आम्ही सदोष वस्तू आधीच ओळखण्यास सक्षम आहोत. यामुळे केवळ ग्राहकांनाच फायदा होत नाही, तर विक्रेते आणि पर्यावरणालाही मदत होते.”
प्रोजेक्ट P.I कसे करते काम
प्रोजेक्ट P.I दोन प्रकारचे AI तंत्र वापरते. यामध्ये ‘जनरेटिव्ह एआय’ आणि ‘कॉम्प्युटर व्हिजन’ समाविष्ट आहे. हे तंत्रज्ञान पॅक केलेला किंवा तुटलेला माल, चुकीच्या रंगाचा माल किंवा चुकीच्या आकाराचा माल ओळखू शकतो. हे सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच कळते. इतकंच नाही हे केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित नसून प्रोजेक्ट P.I. संबंधित गैरप्रकार का झाला हेही शोधून काढते. याच्या मदतीने Amazon भविष्यात होणाऱ्या चुका टाळू शकते. जेव्हा एखादी वस्तू प्रोजेक्ट P.I द्वारे स्कॅन केली जाते तेव्हा ती वस्तू कमी किमतीत विकली जाऊ शकते, दान केली जाऊ शकते किंवा इतर कोणत्या प्रकारे वापरली जाऊ शकते हे Amazon कर्मचारी ठरवतात.
प्रोजेक्ट P.I कुठे वापरले जात आहे
सध्या हे तंत्रज्ञान अमेरिकेत वापरले जात आहे. 2024 च्या अखेरीस त्याचा अधिक ठिकाणी वापर होण्याची अपेक्षा आहे. ॲमेझॉनच्या वर्ल्डवाइड सस्टेनेबिलिटी वाइस प्रेसिडेंट कॅरा हर्स्ट म्हणतात, “एआय हे सुनिश्चित करण्यात मदत करत आहे की आम्ही केवळ ग्राहकांना मोठ्या गोष्टींनी आनंदित करत नाही, तर हे पर्यावरणालाही पूरक आहे.’’ याशिवाय ॲमेझॉनने असेही सांगितले आहे की, ग्राहकांना येणाऱ्या समस्यांचे कारण शोधण्यासाठी ते आणखी एक विशेष एआय प्रणाली वापरत आहे.