भाजपकडून मोदी 3.0च्या हालचाली, काँग्रेसकडून राहुल गांधींना सर्वात मोठी जबाबदारी? लवकरच घोषणा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सर्वात ठरलेला भारतीय जनता पक्ष बहुमतापासून मात्र दूर आहे. त्यामुळे केंद्रात आता मोदी सरकार दिसणार नाही. मित्रपक्षांच्या मदतीनं भाजपनं एनडीए सरकार चालवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी एनडीएमध्ये बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीनं विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा कौल लक्षात घेता प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करु, अशी इंडिया आघाडीची भूमिका आहे.

२०१४ मध्ये ४४ आणि २०१९ मध्ये ५२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनं यंदा ९९ जागांवर यश मिळवलं. त्यामुळे नव्या लोकसभेत मजबूत विरोधी पक्ष दिसेल. एबीपी न्यूजनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, नव्या लोकसभेत राहुल गांधी विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दिसू शकतात. पुढील दोन दिवसांत काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक होईल. त्यात राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. राहुल गांधींनी याआधी कधीही कोणत्याही घटनात्मक पदावर काम केलेलं नाही. देशात काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी कोणतंही मंत्रिपद घेतलेलं नव्हतं. त्यामुळे राहुल गांधी पहिल्यांदाच घटनात्मक पदावर काम करताना दिसू शकतात.
Devendra Fadnavis: मला मोकळं करा! फडणवीसांचा दिल्लीला कॉल; शहांकडून महत्त्वाचा निरोप, महायुतीत नवी घडामोड?
राहुल गांधींनी लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारावी. सदनात पक्षाचं नेतृत्त्व करावी अशी मागणी काँग्रेसमधून जोर धरु लागली आहे. काँग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी ट्विट करुन ही मागणी जाहीरपणे केली आहे. ‘माझे नेते राहुल गांधी यांच्याच नावे मी मतं मागितली. त्यामुळे लोकसभेत राहुल गांधीच काँग्रेसचे नेते असावेत, असं मला वाटतं. काँग्रेसचे अन्य खासदारांच्या मनातदेखील हीच इच्छा असावी असं वाटतं. संसदीय पक्ष काय निर्णय घेतो ते पाहू. आमचा पक्ष लोकशाहीनं चालणारा आहे,’ असं टागोर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी १० टक्के जागा असाव्या लागतात. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ आहे. नव्या लोकसभेत काँग्रेसचे ९९ खासदार असतील. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं उत्तम कामगिरी केली. त्यांच्या २३२ जागा निवडून आल्या. इंडिया आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नव्या लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल.

Source link

leader of oppositionlok sabhaModi governmentRahul Gandhiमोदी सरकारराहुल गांधीलोकसभाविरोधी पक्षनेता
Comments (0)
Add Comment