BSNLआणणार सुपरफास्ट इंटरनेट, ऑनलाइन सिम ऑर्डर केल्यास मिळेल होम डिलीवरी

BSNLने सिम कार्डची होम डिलिव्हरी सुरू केली आहे. ग्राहक आता घरबसल्या सिमकार्ड मागवू शकतात. विशेष म्हणजे याद्वारे त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही आणि सिम घरबसल्या मिळणार आहे. मात्र, ही सेवा संपूर्ण देशात उपलब्ध नाही. सध्या हे फक्त गुरुग्राम आणि गाझियाबादमध्ये सुरू करण्यात आले आहे. सध्या ही सेवा फक्त प्रीपेड युजर्सला दिली जात आहे.

होम डिलिव्हरीसाठी डाउनलोड करावे लागेल हे ॲप

BSNL ने सिम डिलिव्हरीसाठी Pruneसोबत पार्टनरशिप केली आहे आणि ग्राहकांना सिम कार्ड होम डिलीव्हर करणे सुरू होईल. काही खाजगी टेलिकॉम ऑपरेटर हे आधीच करत आहेत. बीएसएनएल हे युजर्स नवीन मिळवण्यासाठी करत आहे. तुम्हाला अनेक प्लॅन्स दिले जाणार आहेत. तुम्हालाही सिमकार्ड मागवायचे असेल, तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Prune ॲप डाउनलोड करावे लागेल.

ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला पर्सनल डिटेल्स एंटर कराव्या लागतील. फोन नंबर आणि डिलिव्हरीचा पत्ता देखील यामध्ये द्यावा लागेल. एकदा सर्व डिटेल्स एंटर केल्यानंतर सिम घरपोच डीलीव्हर केले जाईल. सध्या गुरुग्राम आणि गाझियाबादमध्ये सिम डिलिव्हरी मिळाल्यानंतर, युजर्स त्यांचा अनुभव देखील शेअर करू शकता. कंपनीचे हे करण्यामागचे कारण म्हणजे बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

मात्र, सिम घरपोच डिलिव्हर करूनही ग्राहक आता या सर्विस प्रोवाईडरची निवड करणे टाळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे विणले जात आहे. BSNL कडून लवकरच 4G नेटवर्क देखील लाँच केले जात आहे. त्याच्या मदतीने हे तुमच्यासाठी खूप सोपे होणार आहे.

Source link

BSNLhome deliveryinternetPrepaid UsersSIM Cardsimcard homedilivery
Comments (0)
Add Comment