तुम्ही देखील अशाप्रकारे तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकावू शकता. ही प्रोसेस खूप सोपी आहे आणि यासाठी येणारा देखील जास्त येत नाही. या पद्धतीचा वापर करून तुम्ही मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना वाढदिवसाच्या, लग्नाच्या वाढदिवसाच्या किंवा विजयाच्या शुभेच्छा देऊ शकता. याचा वापर तुम्ही कसा करता हे तुमच्यावर आहे. यासाठी काय प्रोसेस फॉलो करावी लागेल चला ती जाणून घेऊया.
न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर फोटो झळकवण्यासाठी
- सर्वप्रथम तुम्हाला न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डसच्या वेबसाइटवर जावं लागेल.
- त्यानंतर ‘बुक नाऊ’ वर क्लीक करा.
- शुभेच्छा की ब्रँड प्रमोशन यापैकी एकाची निवड करा.
- त्यानंतर आलेल्या तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.
- यात तुमचे नाव, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि तुमच्या फोटो किंवा व्हिडीओला लागणारी फ्रेम निवडा.
- त्यानंतर जो व्हिडीओ आणि फोटो प्रमोट करायचा आहे तो अपलोड करा.
- त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचं पेमेंट करा.
येणारा खर्च
टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डवर फक्त 150 डॉलर्समध्ये फोटो आणि व्हिडीओ झळकवता येतो. ही किंमत सुमारे 12,600 रुपयांमध्ये रूपांतरित होते. या पॅकेजमध्ये तुमचा फोटो किंवा व्हिडीओ दर तासाला 15 सेकंदांसाठी 24 तास दाखवला जाईल. तुमचा ब्रँड प्रमोट करण्याचा खर्च मात्र 250 डॉलर इतका आहे. तुम्ही जास्त खर्च करून आणखी कालावधी देखील खरेदी करू शकता. तसेच तुम्ही बुक केल्यानंतर फक्त 15 मिनिटांनी तुमचा फोटो किंवा व्हिडीओ टाइम्स स्क्वेअरवर शकतो. तुमची जाहिरात नाकारली देखील जाऊ शकते, त्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्यापूर्वी नियम वाचून घ्या.