Vivo X Fold 3 Proची किंमत
भारतात Vivo X Fold 3 Pro चा एकच व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे, ज्यात 16GB रॅम सह 512GB स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 1,59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा सेलेस्टियल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. सध्या हा हँडसेट Vivo इंडिया वेबसाइट, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे आणि याची विक्री 13 जूनपासून सुरु होईल.
लाँच ऑफर अंतर्गत Vivo एचडीएफसी आणि एसबीआय कार्डने पेमेंट केल्यास 15,000 रुपयांची बँक ऑफर देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना 10 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि एकदा मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट करता येईल. तसेच 24 महिन्यापर्यंत नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील आहे.
Vivo X Fold 3 Proचे स्पेसिफिकेशन्स
Vivo X Fold 3 Pro मध्ये 8.03 इंचाचा E7 AMOLED प्रायमरी डिस्प्ले आहे, ज्यात 2K 2,200×2,480 पिक्सल रिजोल्यूशन, 4,500 निट्स पीक ब्राइटनेस, डॉल्बी व्हिजन आणि HDR10 सपोर्ट आहे. तसेच यात 6.53 इंचाचा AMOLED कव्हर डिस्प्ले आहे, जो 1,172×2,748 पिक्सल रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
हा स्मार्टफोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर चालतो. Vivo X Fold 3 Pro मध्ये ऑक्टा कोर Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 16GB LPDDR5X RAM आणि 512GB UFS4.0 इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी Vivo X Fold 3 Pro मध्ये Zeiss सपोर्टसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 64 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.
कनेक्टिव्हिटीसाठी 5G, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस, BeiDou, GLONASS, Galileo, QZSS, NavIC, A-GPS, OTG आणि यूएसबी टाइप सी पोर्ट आहे. Vivo च्या या फोनमध्ये 5,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.