PM Modi Commented On Stock Market: निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पहिला बॉम्ब टाकला; तिसरी टर्म सुरू होण्याआधी मोदी-शहांवर गंभीर आरोप

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. इंडिया या विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी निकालाच्या ४८ तासानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टार्गेट करून पुढील पाच वर्षे संसदेत आणि संसदेच्या बाहेर त्यांना एका मजबूत विरोधकाशी सामना करावा लागेल याचा ट्रेलर दाखवला.लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजाराबाबत संभ्रम निर्माण केल्याचा आरोप केला. ४ जूननंतर शेअर बाजार वर जाणार असल्याचे सांगण्यात आले. मोदींनी अनेक वेळा शेअर बाजाराचा उल्लेख केल्याचा दावा राहुल गांधी यांनी पुराव्यांसह दिला. फक्त मोदींच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील गुंतवणुकदारांना शेअर खरेदी करण्यास सांगितले होते. यामुळेच ३ जूनला शेअर बाजाराने सर्व रेकॉर्ड मोडले. बाजारात झालेली ही वाढ हा एक मोठा स्कॅम असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
Nitish Kumar in NDA govt: नितीश कुमारांची शांतता वादळापूर्वीची तर नाही? मोदींकडून काय काय मागायचे याची यादी तयार, फक्त…

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह भाजपच्या अन्य नेत्यांकडून शेअर बाजाराबाबत टिप्पणी करण्यात आली होती, असे सांगत राहुल गांधी यांनी खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम झाल्याचे सांगितले. खोटे एक्सिट पोल आणि बाजपचा काय संबंध आहे याची चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली. शेअर बाजारात सामान्य गुंतवणुकदारांचा मोठा तोटा झाला असून याची संसदीय समितीने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. निकालाच्या दिवशी शेअर मार्केट जोरदार कोसळला होता आणि एका दिवसात ३० लाख कोटींचे नुकसान झाले होते.

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. त्याआधी एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात निकालात भाजपला २४० जागा मिळाल्या तर एनडीएला ३००चा आकडा पार करता आला नाही.
Breaking News: निकालानंतर खदखद बाहेर निघण्यास सुरूवात; पारनेरमध्ये खासदार लंके-विखे समर्थकांचा राडा, लंके समर्थक झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला

या उलट विरोधकांच्या इंडिया आघाडीने अनपेक्षितपणे कामगिरी उंचावली. काँग्रेसने २०१९मध्ये ५२ जागा जिंकल्या होत्या, आता त्यांची संख्या ९९ इतकी झाली आहे.

Source link

amit shah commented on stock marketbiggest stock market scaminvestors lost rs 30 lakh crorepm modi commented on stock marketRahul Gandhirahul gandhi demand jpc proberahul gandhi demand jpc probe stock market scamअमित शाहनरेंद्र मोदीराहुल गांधी
Comments (0)
Add Comment