Bjp In Ayodhya : प्रभू श्रीरामाने मोदींना अयोध्येत नाकारलं, भव्य मंदिर बांधूनही भाजपचा पराभव, विषय कुठं गंडला ?

नवी दिल्ली : जानेवारी २०२४ मध्ये अयोध्यानगरीत एकच जल्लोष पाहायला मिळाला तो म्हणजे राम मंदिर उद्घाटनाचा. २२ जानेवारी रोजी राममंदिराचे काम पूर्ण झाले अन् भाजपचे स्वप्न पूर्णत्वास आले. परंतु याच अयोध्येने भाजपला नाकारले आहे. (४ जून) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये एनडीए सरकारला बहुमत मिळालं पण अयोध्येत मात्र भाजपचा पराभव झाला.

समाजवादी पार्टीने मारली बाजी

अयोध्या हा फैजाबाद मतदारसंघाचा एक भाग असून येथे भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशी लढत होती. यामध्ये भाजपचे लल्लू सिंह यांना ४,९९,७२२ मते मिळाली. तर समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद (सपा) यांना ५,५४,२८९ मते मिळाली. आणि तब्बल ५४,५६७ इतक्या मतांची लीड घेऊन अवधेश प्रसाद यांचा विजय झाला .

भाजपच्या पराभवाची कारणे काय ?

अयोध्येत राममंदिर बांधणे हे भाजपचे स्वप्न होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राममंदिर हा सर्वात मोठा आकर्षणाचा मुद्दा होता. ‘मंदिर वही बनाया है’, ‘जो राम को लाये है, हम उनको लाएंगे’ अशा घोषणा भाजपच्या रॅलीत वारंवार दिल्या जात होत्या. त्यामुळे भाजपचा पराभव होईल हे अनपेक्षितच होते. परंतु असे न होता भाजपचा पराभव झाला. १९८४ पासून तर आतापर्यंत सपा आणि काँग्रेसने फैजाबादची जागा प्रत्येकी दोनदा जिंकली आहे. त्यानंतर १९९१ च्या रथ यात्रेनंतर अयोध्येत भाजपचे वर्चस्व वाढले. आणि या जागेवर भाजपचे विनय कटियार ११९१, १९९६ आणि १९९९ या साली तीनदा विजयी झाले. कटियार हे कुर्मी जातीचे आणि हिंदुत्वाचा चेहरा असल्याने धर्म आणि जात या दोन्हींचा आदर केला जात असे. परंतु २००४ मध्ये भाजपने विनय कटियार यांचे तिकीट रद्द करून लल्लू सिंह यांना दिले. पण १९८९ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर आणि १९९८ मध्ये सपाच्या तिकीटावर विजयी होऊन खासदार झालेल्या बसपच्या मित्रसेन यादव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
Nitish Kumar in NDA govt: नितीश कुमारांची शांतता वादळापूर्वीची तर नाही? मोदींकडून काय काय मागायचे याची यादी तयार, फक्त…

मंदिर झालं पण स्थानिक प्रश्नांवरून मतदार नाराज

अनेक दशके चाललेल्या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधले गेले. भाजपनेही जोरदार प्रचार केला, मात्र राम मंदिर हा मोठा मुद्दा होऊ शकला नाही, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. अयोध्या जरी राम मंदिराच्या भव्यतेने आकर्षित झाले असले. तरी तेथील गैरसोयीमुळे स्थानिक नाराज असल्याचं सांगण्यात आले आहे.

फैजापूर मतदारसंघात स्थानिक समस्यांबाबत चर्चा होत्या. मंदिर आणि विमानतळाच्या आजूबाजूला होत असलेल्या भूसंपादनामुळे अयोध्येतील अनेक गावांमध्ये संताप आहे. अयोध्येमध्ये विकासाची कामे करण्यात आली. शहरात १४ किलोमीटर लांबीचा रामपथ तयार करण्यात आला. त्याचबरोबर भक्तिमार्ग आणि रामजन्मभूमी मार्ग हे दोन मार्ग देखील तयार करण्यात आले. परंतु हे मार्ग होत असताना स्थानिक नागरिकांचे घरे पाडण्यात आली. त्यातील ज्या लोकांकडे कागदपत्रे होते. अशा लोकांनाच भरपाई मिळाली. इतर लोकांना भरपाई मिळाली नाही असं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रॉयटर्ससह अनेक माध्यमांच्या वृत्तांत याची उदाहरणे आढळतात. एका व्यक्तीचे २०० वर्षे जुने दुकान होते, परंतु त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांचे दुकान पाडण्यात आले. त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही.

अयोध्येतील भाजपच्या पराभवाचे अनेक कारणे आहेत. जसे की, ओबीसी आणि दलितांना भाजपपासून वेगळे करणे, अखिलेश यादव यांचा पीडीए (मागास, दलित आणि अल्पसंख्याक) फॉर्म्युला, लल्लू सिंह यांच्या वागणुकीबद्दल स्थानिक लोकांमध्ये संताप. या कारणांमुळे भाजपला ही जागा जिंकता आली नाही.

Source link

Ayodhyaayodhya newsAyodhya Ram Mandir TOPICfaizabad lok sabha electionloksabha election 2024
Comments (0)
Add Comment