वॉशिंग्टन पोस्टने लिहले की,’लोकप्रिय पंतप्रधान त्यांच्या २३ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत राज्य आणि केंद्राच्या निवडणुकीत बहुमत मिळवण्यास कधीच अयशस्वी ठरले नाही. मागील निवडणुकीत त्यांनी मोठ्या विजयाचा आनंद घेतला. पण आत्ता मोदी यांना राजकीय धक्का बसल्याचे दिसत आहे. मतदानाची सुरुवातीची आकडेवारी त्यांच्या हिंदु राष्ट्रवादी पक्षासाठी कमजोर करताना दिसत आहे.’
न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या बातमीत लिहले की, ‘ नरेंद्र मोदींच्या भोवतालचा अजिंक्यतेचा भ्रम तुटला आहे. मंगळवारी भाजपने आपली सर्वात आवडती आयोध्येची जागा गमावली. हा उत्तर प्रदेशमधून भाजपला निवडणुकीत मिळालेला मोठा झटका होता.’
आयोध्याच्या पराभवावर पाकिस्तान मिडिया काय बोलली?
पाकिस्तानच्या डॉन वर्तमानपत्राने आपल्या बातमीचे शीर्षक दिले, भारतात मतमोजणीवरुन हे लक्षात येते की मोदी आश्चर्यपद्धतीने युतीमुळे बहुमत मिळवून जिंकत आहे. त्यांनी बातमीत लिहिले, भाजपने आयोध्येतील पराभव स्विकारला जिथे त्यांनी राम मंदिराचे उद्धघाटन केले होते. राहुल गांधी बोलतात की, मतदारांनी भाजपला शिक्षा दिली आहे. विशेष म्हणजे यूपीमधील आयोध्येची जागा त्यांनी गमावली ज्यात भाजपचा प्रतिष्ठित प्रकल्प आयोध्येचे राम मंदिर याचा समावेश होता. त्यामुळे अनेक लोकांना याचा धक्का लागला आहे.
युतीच्या राजकारणामुळे तडजोड करावी लागणार?
अल जजीराने म्हटले की, संसदेत आव्हाने येतील. असे काही बिल जे पास करावे लागतील ज्यासाठी त्यांना तडजोड करावी लागणार. जेव्हा मागील निवडणुकीत त्यांनी प्रचंड बहुमत मिळवले होते तेव्हा ते तडजोड करत नव्हते. एका विश्लेषकाने सांगितले, मोदींनी स्वत:ची तडजोड न करणारे व्यक्ती अशी प्रतिमा तयार केली आहे.
फायनेंशियल टाइम्स म्हणाले की, ‘हा निकाल युती राजकारणाची सुरुवात करेल. काही भारतीयांना निवडणुकीत मोदींचा विजय होईल अशी आशा होती. याकडे मोदींच्या कारकिर्दीच्या दशकातील सार्वमत म्हणून पाहिले जात आहे.’