मे महिन्यात केलं होतं उड्डाण
चीनने चँग ए-६ या यानाचे (३ मे) रोजी उड्डाण केले होते. या भागातील मौल्यवान खडकाचा भाग आणि माती गोळा करणं हा मोहिमेचा उद्देश आहे. इतिहासात प्रथमच अशाप्रकारची मोहीम राबवण्यात आली आहे, असं चीनने म्हटलं आहे.
यापूर्वीही अशी कामगिरी करणारा चीन एकमेव देश ठरला
चँग ए-६ या यानातील प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या सर्वात जुन्या खडकातून काही नमुने गोळा करणार आहेत. या यानाचं लँडिंग करणे कठीण असल्याने ते चीन समोर एक मोठे आव्हान होते. यापूर्वीही हे यश मिळवणारा चीन एकमेव देश आहे. त्यांनी २०१९ मध्ये त्यांचं चँग ई-४ ची यशस्वी लँडिंग केली होती.
दरम्यान, या यानाचं लँडर जवळपास तीन दिवस चंद्राच्या या भागात राहून त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या घटकांचे नमुने गोळा करणार आहे. या मोहिमेमध्ये अभियांत्रिकेतील नावीन्य, मोठा धोका आणि अनेक कठीण बाबींचा समावेश होता, असं सीएनएसए ने म्हटले आहे.
चीनकडून ३ मानवविरहीत चंद्र मोहिमांचे उद्दीष्ट
२०२० मध्ये चँग ई-५ या मोहिमेत ओशेनस प्रोसेरम या चंद्राच्या जवळच्या भागातून १ .७ किलोचे नमुने आणले होते. चीननं चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी पाण्याचा शोध घेण्याच्या उद्देशानं या दशकात आणखी तीन मानवविरहीत चंद्रमोहीमांचे उद्दीष्ट ठेवले आहे. २०३० पर्यंत चीनच्या अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवण्याचा व्यापक दृष्टीकोन त्यामागे आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेनंही २०२६ मध्ये त्यांच्या आर्टेमिस ३ मोहिमेद्वारे पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.