व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कारमध्ये टेबल फॅनसारखे डिवाइस बसवण्यात आले आहे, ज्याला वॉटर स्प्रे फॅन म्हणतात. देसी जुगाड वापरून त्या व्यक्तीने एसी कार बनवली आहे. ते डिवाइस टाइप सी सह ऑपरेट केले जाऊ शकते. या पंख्याच्या वरच्या बाजूला एक स्लॅब आहे, जिथे बर्फाचे तुकडे आणि पाणी ठेवता येते. तुम्ही ते चालू करताच, वाऱ्यासोबत पाण्याचे शिडकाव होतो. असे केल्याने, व्यक्तीला कारचा एव्हरेज तर सुधारतोच, पण सोबत थंड हवाही मिळते.
https://www.instagram.com/reel/C6bCmW5oGcjhttps://www.instagram.com/reel/C6bCmW5oGcj
हा व्हिडिओ बालाजी साउंड सिस्टम नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने 1 मे रोजी शेअर केला होता, ज्याला अवघ्या 4 दिवसांत 2 लाखांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. लोकांनी ही एक अनोखी आयडिया मानली आहे. सध्या या व्हिडिओला 63 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
कुठे खरेदी करता येईल?
तुम्ही हे पोर्टेबल कुलर ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. तुम्ही 1000 ते 1500 रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. तुम्हाला ते एसीच्या ठिकाणी बसवावे लागेल. असे केल्याने तुम्हाला थंडगार हवा मिळेल.