Birth Numerology : ८, १७ आणि २६ तारखेला जन्मणाऱ्या व्यक्तींचे जीवन कसे असते? वाचा अंकभविष्य

Numerology Prediction :

अंकज्योतिषास्त्रानुसार जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, त्याचे नशीब, करिअर आणि इतर अनेक गोष्टींबद्दल आपल्याला कळते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मूलांक क्रमांक शोधला जातो. यामध्ये मूलांक संख्या ही १ ते ९ पर्यंतची असते.

मूलांक शोधण्यासाठी व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज केली जाते. ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक क्रमांक ८ आहे. यांच्यावर शनिदेवाची कृपा असते.

प्रत्येक मूलांकाबाबत त्याचा शासक ग्रह असतो. जो प्रत्येक मूलांकावर प्रभाव टाकतो. शनि हा क्रमांक ८ चा शासक ग्रह मानला जातो. नऊ ग्रहांपैकी शनिदेवाला न्याय आणि कर्म देवता मानले जाते. जो व्यक्तीच्या कर्माच्या आधारावर फळ देतो. जाणून घेऊया ८ मूलांक असणाऱ्या व्यक्तीचे जीवन कसे असते त्याविषयी.

८ क्रमांक असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व कसे असते?

  • मूलांक ८ असलेल्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव असतो, त्यामुळे या लोकांना नेहमी न्यायाने वागायला आवडते. मूलांक ८ असलेल्या लोकांना त्यांच्या कर्माच्या आधारावर फले मिळतात. ते त्यांच्या कर्मावर अधिक विश्वास ठेवतात.
  • ८ व्या क्रमांकाच्या लोकांना व्यवस्थितरित्या फिरायला अधिक आवडते. त्यांना विखुरलेल्या गोष्टी अधिक आवडत नाही. त्यांना भौतिकवाद आणि अध्यात्म यांच्यात संतुलन राखणे आवडते.
  • कोणत्याही बाबतीत निर्णयक्षमता ही त्यांच्या स्वभावावर अवलंबून असते. ८ वा क्रमांक असलेले लोक न्यायाच्या क्षेत्रात गेले तर त्यांना यश सहज मिळते.
  • आर्थिक व्यवहार त्यांचे अधिक चांगले असतात.
  • शनीच्या प्रभावामुळे त्यांना जीवनात संघर्ष करावा लागतो. यश मिळवण्यासाठी त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते आणि कठोर परिश्रम देखील करावे लागतात.
  • मूलांक ८ असणाऱ्या व्यक्तींचे ५ आणि ६ क्रमांकाच्या लोकांशी चांगले जमते. मूलांक ५ चा शासक ग्रह बुध आहे, तर मूलांक ६ चा ग्रह शुक्र आहे.
  • मूलांक १ असणाऱ्या लोकांशी त्यांचे अजिबात पटत नाही कारण त्याचा अधिपती सूर्य ग्रह आहे.


टीप :
ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

astrologyBirth DateBirth numerologyfuture predictionhoroscopemulank 8rashi bhavishya in marathi
Comments (0)
Add Comment