Saturday Remedies In Marathi :
हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. शनिवार हा दिवस शनिदेवाला अर्पण केला गेला आहे. शनिवारी शनिदेवाची पूजा विधीपूर्वक करतात.
शनिदेव लोकांच्या चांगल्या-वाईट कर्माचा हिशोब ठेवतात. शनिदेवाला न्याय आणि कर्माचा देवता म्हटले गेले आहे. जर तुमच्या कुंडलीत शनि दोष, महादशा, साडेसाती असल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक कठोर परिश्रम करतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्न राहातात. जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर तुम्हाला नियमितपणे शनिदेवाची उपासना करायला हवी.
सतत आर्थिक संकटे येत असतील? कामात अपयश येत असेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन रखडले गेले असेल? वैवाहिक जीवनातील अडथळे? संतती सुख आणि नात्यात दूरावा येत असेल तर शनि ग्रहाच्या नकारात्मकतेचा प्रभाव मानला जातो. तुम्ही दर शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर अनेक संकटांपासून मुक्त व्हाल.
1. कुंडलीतील शनिदोष दूर करुन शनिदेवाची कृपा आणि आशीर्वाद मिळवायचा असेल तर शनिवारी व्रत आणि विधीनुसार पूजा करा. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा करा. त्यावर जल अर्पण करुन तेलाचा दिवा लावा. झाडाला किमान सातवेळा प्रदक्षिणा घाला. असे केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतील.
2. काळा कुत्रा हे शनिदेवाचे वाहन मानले जाते. त्यामुळे त्याला चपाती खाऊ घाला. असे केल्याने शनीदोषापासून मुक्ती मिळते. तसेच काळे कपडे, काळे तीळ, काळे उडीद, गूळ, तेल इत्यादी गोष्टी शनिवारी गरीब किंवा गरजूंना दान करा. हे काम शांतपणे केल्याने फायदा होईल.
3. आर्थिक अडचणी आणि कर्जाचा डोंगर वाढत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी शनिवारी काळ्या गाईची पूजा करा. कपाळावर कुंकू लावून टिळा लावा. गाईला बुंदीचे लाडू आणि चारा खाऊ घाला. असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते.
4. दर शनिवारी हनुमान चालीसा आणि शनिस्त्रोताचे पठण करा. यामुळे शनिदेवाची कृपा आपल्यावर राहाते. तसचे मासे आणि पक्ष्यांना चारा खाऊ घाला असे केल्याने जीवनातील नकारात्मक दूर होते. रखडलेले कामे मार्गी लागतात.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.