अरविंद केजरीवाल यांना जामीन नाकरताना कोर्ट म्हणाले, केजरीवाल यांच्या निवडणुक प्रचार दौऱ्यातून स्पष्ट होते की केजरीवालांना कोणताही गंभीर किंवा जीवघेणा आजारांची बाधा झालेली नाही असे अंतरिम जामीन नाकारताना निरीक्षण दिल्ली न्यायालयाने नोंदवले आहे. यासह जामिनावर असताना केजरीवालांना वैद्यकीय चाचणी का केली? असा सवाल न्यायाधीशांनी केला. तसेच जेल अधिक्षकांना केजरीवाल यांची त्वरित वैद्यकीय चाचणी करुन त्यांना कोणताही आजार आढळल्यास तातडीने उपचार करा असे आदेश कोर्टाने दिले. यापूर्वी, १ जून रोजी न्यायालयाने केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
कोर्टात काय युक्तीवाद झाला?
ईडीकडून अरविंद केजरीवाल यांचा वैद्यकीय आधारावरील जामिनावर आक्षेप घेण्यात आला केजरीवाल प्रचारादरम्यान स्वस्थपूर्ण होते मग आता त्यांना वैद्यकीय आधारावर जामीव देण्यास ईडीने विरोध दर्शवलाय तर दुसरीकडे केजरीवालांच्या वकिलांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांच्या प्रचारांसाठी केजरीवालांना जामीन मंजूर केला होता त्यामुळे त्यांनी सभा घेणे प्रचार करणे हा मुळ उद्देश्य होताच पण याच धावपळीत केजरीवालांची प्रकृती बिघडली म्हणून सात दिवसांचा जामीन द्या असा युक्तीवाद त्यांनी केलाय.
१० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. शेवटच्या सात टप्प्यातील निवडणुका संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २ जून रोजी त्यांना पुन्हा कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले. अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर केजरीवाल यांनी उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्रात निवडणुकीदरम्यान प्रचार केला. केजरीवाल यांच्या अर्जावरील न्यायालयीन कामकाजादरम्यान केजरीवाल यांच्या वकिलांनी केजरीवाल आजारी आहेत आणि त्यांना वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत म्हणून सात दिवसांचा जामीन वाढवून द्या अशी मागणी केली होती.