चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या बाबतीत Realme नेहमीच सर्वात पुढे राहिली आहे. 2021 मध्ये कंपनीनं GT Master Edition स्मार्टफोनसह आपली 65W डार्टचार्ज टेक्नॉलॉजी सादर केली होती जी 33 मिनिटांत यातील 4300mAh बॅटरी फुल चार्ज करू शकते. त्यानंतर 2022 मध्ये Realme नं 150W चार्जिंग सपोर्टसह GT Neo 3 सादर केला जो 4500mAh ची बॅटरी फक्त 5 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतो.
ब्रँडनं गेल्यावर्षी फ्लॅगशिप Realme GT Neo 5 सादर केला जो 240W चार्जिंग स्पीड देतो. त्यामुळे युजर्स 10 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत आपला फोन फुल चार्ज करू शकतात. आता यापेक्षा फास्ट 300W टेक्नॉलॉजी तयार तयार करण्यात आली आहे. Redmi सध्या फोनसाठी 300W चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला एकमेव ब्रँड आहे. त्यांच्या डेमोमध्ये फोन 3 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो आणि 5 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत फुल चार्ज होतो.
Realme च्या 300W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी बाबत सध्या जास्त माहिती नाही. वॉंग यांनी मुलाखतीत चार्जिंग टाइम किंवा इतर कोणतीही माहिती दिली नाही. तसेच ही टेक्नॉलॉजी व्यावसायिक फोन्समध्ये उपलब्ध होईल की नाही किंवा कधी होईल याबाबत देखील कोणतीही माहिती मिळाली नाही.
फास्ट चार्जिंग त्यांच्यासाठी चांगली सुविधा आहे जे सतत घाईत असतात. परंतु फास्ट चार्जिंग स्पीडमुळे फोन जास्त गरम होण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम थेट बॅटरी हेल्थवर होऊ शकतो. त्यामुळे हाय-वॉट कपॅसिटी असलेल्या चार्जिंग सपोर्टसाठी चांगला इंफ्रास्ट्रक्चर असावा जसे की जास्त मोठी व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम, ज्यामुळे फोनची किंमत वाढू शकते. Realme या समस्या कशी सोडवते आणि 300W फास्ट चार्जिंग बाजारात कधी घेऊन येते हे पाहावं लागेल.