मोदींविरुद्ध आवाज उठवा, दबाव वाढवा! संघाचा प्लान ठरला? ३ पर्याय तयार, सक्रिय झाला परिवार

नवी दिल्ली: जुन्या संसद भवनात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक सुरु आहे. त्यात एनडीएच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली. या प्रस्तावाला एनडीएमधील सगळ्याच पक्षांनी अनुमोदन दिलं. त्यामुळे मोदींच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण दुसरीकडे राष्ट्रीय संघ परिवारात वेगळ्याच घडामोडी सुरु झाल्या आहेत.

लोकसभेत भाजपचं घडलेलं संख्याबळ पाहता संघ परिवार ऍक्टिव्ह झाला आहे. एनडीएचं नेतृत्त्व करण्यासाठी संघ दुसऱ्या नावांचा विचार करत असल्याची माहिती संघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिल्याची माहिती ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं दिली आहे. भाजपच्या घडलेल्या संख्याबळाकडे संघ आपल्या मर्जीतील नेत्याची पंतप्रधानपदी वर्णी लावण्याची संधी म्हणून पाहत असल्याची चर्चा आहे.
आकड्याचा घटला जोर, शिंदेंच्या आमदारांकडून परतीचे दोर? घरवापसीसाठी ठाकरेसेनेकडून महत्त्वाची अट
‘२०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं २८२ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये ३०३ जागांवर यश मिळवलं. दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपनं स्वबळावर जादुई आकडा गाठला. पण २०२४ मध्ये हाच आकडा २४० पर्यंत खाली आला आहे. मोदींची लोकप्रियता कमी होत असल्याचं हे द्योतक आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवा चेहरा देण्याची गरज आहे,’ असं संघातील सुत्रांनी सांगितलं.
विधानसभेला सहन करणार नाही! भाजपचा आकडा घटताच शिंदेसेनेचा आवाज वाढला; मित्रपक्षावर थेट निशाणा
मोदींच्या जागी कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरींची नावं चर्चेत आहेत. पण कोणाचंही नाव अद्याप तरी निश्चित झालेलं नाही, असं संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं सांगितलं.

संघ आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या, परिवाराशी निकटवर्तीय असलेल्या खासदारांच्या मदतीनं मोदींना हटवू शकतो, अशी शक्यता पदाधिकाऱ्यानं बोलून दाखवली. ‘मोदींविरोधात आवाज उठवा. त्यांच्यावर दबाव वाढवा. त्यांनी पायउतार व्हावं अशी परिस्थिती निर्माण करा, अशी सूचना संघाकडून त्यांच्याशी प्रामाणिक असलेल्या खासदारांना केली जाऊ शकते,’ असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

Source link

Narendra ModiNitin GadkariRSSsangh parivarshivraj singh chauhanआरएसएसनरेंद्र मोदीनितीन गडकरीशिवराज सिंह चौहानसंघ परिवार
Comments (0)
Add Comment