May Hottest Month: यंदाच्या मे महिन्यातील उष्मालाट सर्वांत तीव्र; तापमानात दीड अंश सेल्सिअसने वाढ झाल्याची नोंद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : देशभरात मे महिन्यात नेहमीच उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव येतो. यंदाच्या मे महिन्यात मात्र तुलनेने अधिक प्रमाणात उष्णतेच्या लाटा होत्या, असे एका संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. मेमधील नेहमीच्या तापमानापेक्षा यंदा तापमान जवळपास दीड अंश सेल्सियस अधिक नोंदवला गेल्याचे चिंताजनक तथ्य यातून पुढे आले आहे. क्लायमामीटर संस्थेच्या पर्यावरण शास्त्रज्ञांनी व संशोधकांनी हा अहवाल दिला आहे.

झळा कशामुळे?

– यंदाच्या मेमध्ये देशभरात दीर्घकाळ व अधिक तीव्रतेची उष्मालाट होती, असे या संशोधकांनी म्हटले आहे.
– उत्तर-पश्चिम भारत व मध्य भारतात मेमध्ये कमालीचा उष्मा जाणवला व मार्च ते मे या कालावधीत उष्माघाताच्या सुमारे २५ हजार तक्रारी प्राप्त झाल्या. यातील ५६ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला.
– तापमानात झालेली ही वाढ म्हणजे अल निनोचा परिणाम असल्याचे या संशोधकांचे निरीक्षण.
– प्रशांत महासागराच्या मध्य व पूर्व उष्णकटिबंधीय क्षेत्रात झालेली तापमानवाढही या उष्मालाटांसाठी कारणीभूत.
– याशिवाय, कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनसारख्या वायूंच्या वाढत्या उत्सर्जनामुळेही तापमानात वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
– १९७९ ते २००१ या कालावधीच्या तुलनेत २००१ ते २०२३ या कालावधीत मेमधील तापमानात कशाप्रकारे बदल होत गेला यावरही संशोधन.
– या दोन्ही कालखंडातील पर्जन्यमानात फारसा फरक न होऊनही मेमधील तापमानात दीड अंश सेल्सियसने वाढ झाल्याची माहिती.
नव्या संसदेत बसणार साक्षात धनकुबेर; ९३ टक्के खासदार कोट्यधीश, जाणून घ्या टॉप-३मध्ये कोण?
उपाय काय?

– जीवाश्म इंधनाच्या (प्रामुख्याने कोळसा) वापरामुळे भारतातील उष्म्याच्या लाटा असह्य ठरत असल्याच्या निष्कर्षावर क्लायमामीटरच्या संशोधनामुळे शिक्कामोर्तब झाले आहे, असे मत फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे डेव्हिड फरेंडा यांनी व्यक्त केले.
– भारताच्या अनेक शहरांत तापमानाचा पारा ५० अंश सेल्सियसवर पोहोचत असताना त्यावर काहीही तांत्रिक उपाययोजना करणे शक्य नाही असेही फरेंडा यांचे मत.
– कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे व उष्णकटिंबधीय प्रदेशांतील तापमान नियंत्रणात ठेवणे हेच यावरील उपाय आहेत, असे फरेंडा यांनी स्पष्ट केले.

Source link

carbon dioxide emissionsclimate changeenvironmental scientistshigh tempretureMay Hottest Month
Comments (0)
Add Comment