खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं होतं; उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला

सिंधुदुर्गः सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लोकर्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नारायण राणे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाकरे शैलीत भाषण करत नारायण राणेंना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच काही शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरुवात केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आजचा क्षण हा आदळाआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचेही आभार मानले आहेत. ‘ज्योतिरादित्य यांचे अभिनंदन करतो. कारण इतक्या लांब राहुनही तुम्ही मराठी मातीचा संस्कार विसरले नाहीत. ज्योतिरादित्य विमानतळाविषयी अधिक तळमळीने बोलत होते,’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

‘आपलं कोकणच महाराष्ट्राचं वैभव आहे ते जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्यात विमानतळ सर्वात महत्त्वाचा भाग आहे, असं सांगतानाच एवढे वर्ष विमानतळाला का लागले? आम्ही कोकणचं कॅलिफॉर्निया करु असं काहीजण म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की कॅलिफोर्निओला अभिनमान वाटेल असं कोकण उभं करु,’ अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली आहे.

‘सिंधुदुर्गच्या विकासाचे कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव येऊ शकत नाही’

‘आदित्य ठाकरेंनी बाकी पर्यटनाबाबत सांगितले आहेत. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं,’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंनाही टोला लगावला आहे. बाळासाहेबांना खोटं बोलणारे लोकं आवडत नव्हते, असं राणे म्हणाले होते. हाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी राणेंना टोला लगावला आहे. ‘नारायण राणे बोलले त्या प्रमाणे बाळासाहेबांना खोटं बोलणारे लोकं आवडत नव्हते आणि खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी तेव्हा शिवसेनेतून काढून टाकलं होतं, हे लक्षात असू द्या,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. तसंच, लघु का असेना , मोठं का असेना एक मोठं खातं तुमच्याकडे आलंय. त्याचा वापर महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही कराल, अशी आशा आहे, असा टोमणाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

वाचाः ‘त्या’ तिघांना सोडण्यासाठी भाजपा नेत्यांचे फोन; समीर वानखेडेंनी उत्तर द्यावे’

Source link

chipi airport inaugurationcm uddhav thackerayuddhav thackeray vs narayan raneचिपी विमानतळनारायण राणेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment