ATM द्वारे पैसे काढण्यासाठी ATM कार्ड आवश्यक आहे. मात्र, अनेक वेळा असे घडते की, तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाता, परंतु तुमचे डेबिट कार्ड घेऊन जाण्यास विसरतात. अशा परिस्थितीत आता तुमचा स्मार्टफोन तुम्हाला मदत करेल. होय, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या UPI ॲपद्वारे एटीएममधून पैसे काढू शकता. ही सुविधा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फार पूर्वी सुरू केली होती. मात्र, बहुतांश लोकांकडे याबाबत फारशी माहिती नाही.अशा परिस्थितीत तुमच्या सोयीसाठी आज आम्ही तुम्हाला UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्याबाबत माहिती देणार आहोत. येथे आम्ही तुम्हाला डेबिट कार्डाशिवाय एटीएममध्ये UPI रोख काढण्याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती देत आहोत.
UPI वापरून ATM मधून कसे काढायचे पैसे
- डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्यासाठी, तुम्हाला आधी तुमच्या जवळच्या एटीएममध्ये जावे लागेल.
- आता तुम्हाला एटीएम मशीनमध्ये दिसणारा ‘UPI कॅश विथड्रॉल’ हा ऑप्शन निवडावा लागेल.
- यानंतर तुम्हाला एटीएम मशीनमध्ये काढायची असलेली रक्कम टाकावी लागेल.
- यानंतर एटीएम स्क्रीनवर तुमच्या समोर एक QR कोड जनरेट होईल.
- आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये असलेले UPI ॲप उघडावे लागेल.
- यानंतर, त्या UPI ॲपमध्ये ATM वर दिसणारा QR कोड स्कॅन करा.
- कोड स्कॅन करताना, तुम्ही एंटर केलेली रक्कम एटीएममधून बाहेर येईल.
अशा प्रकारे तुम्ही UPI ॲपद्वारे एटीएममधून सहज पैसे काढू शकाल. यासाठी तुम्हाला कोणत्याही डेबिट कार्डची गरज भासणार नाही.
लक्षात घेण्यासारख्या गोष्टी
- UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पैसे काढण्यापूर्वी, तुमच्या UPI ॲपमध्ये UPI-ATM ट्रान्झेक्शन एनेबल असल्याची खात्री करा.
- याशिवाय तुम्ही ज्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला आहात ते देखील UPI एनेबल असले पाहिजे.