‘अर्थराइज’ हे गाजलेले छायाचित्र घेणारा अंतराळवीर हरपला; विल्यम अँडर्स यांचे विमान अपघातात निधन

वृत्तसंस्था, सीअ‍ॅटल : ‘नासा’च्या अपोलो८ मोहिमेतील माजी अंतराळवीर निवृत्त मेजर जनरल विल्यम्स अँडर्स (९०) यांचे शुक्रवारी विमान अपघातात निधन झाले. अँडर्स चालवत असलेले विमान अमेरिकेच्या वॉशिंग्टन प्रांतातील सॅन जुआन बेटांजवळील समुद्रात कोसळून हा अपघात झाला. सन १९६८मध्ये त्यांनी अंतराळातून टिपलेले ‘अर्थराइज’ हे पृथ्वीचे पहिले रंगीत छायाचित्र अत्यंत गाजले होते आणि या छायाचित्रानेच पर्यावरणरक्षणाच्या मोहिमेला चालना दिली होती.

विल्यम अँडर्स यांचे पुत्र आणि अमेरिकेच्या हवाई दलातील निवृत्त लेफ्टनंट कर्नल ग्रेग अँडर्स यांनी विल्यम यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. आम्हा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बीच ए४५ प्रकारचे हे जुन्या पद्धतीचे विमान होते आणि अपघातावेळी केवळ अँडर्स हेच या विमानात होते.
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सने रचला इतिहास ; मिशनवर अंतराळयान उडवणारी पहिली महिला
‘बिल अँडर्स यांनी अपोलो८वरून घेतलेल्या ‘अर्थराइज’ या छायाचित्राने आपल्या पृथ्वीबद्दलची मनुष्याची धारणाच बदलली. त्यांनी माझ्यासह अंतराळवीरांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली,’ अशी भावना ‘नासा’चे निवृत्त अंतराळवीर मार्क केली यांनी व्यक्त केली.

Source link

Apollo 8Earthriseenvironmental conservationFormer astronaut Williams AndersNasaspace explorationWilliam AndersWilliam Anders death in plane crashविल्यम अँडर्स
Comments (0)
Add Comment