मोदी कॅबिनेटमधील संभाव्य मंत्र्यांना दिल्लीहून फोन; महाराष्ट्रातून कोण कोण? ५ नावं समोर

नवी दिल्ली: दिल्लीत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. नरेंद्र मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची वाताहत झाली. राज्यात महायुतीला १७ जागांवर यश मिळालं. पुढील काही महिन्यांत राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्याला किती आणि कोणती मंत्रिपदं मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.

नरेंद्र मोदींच्या शपथविधीआधी पंतप्रधान कार्यालयातून संभाव्य मंत्र्यांना फोन जाऊ लागले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पियूष गोयल, नितीन गडकरी, रक्षा खडसे या भाजपच्या खासदारांना मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. मित्रपक्षांचा विचार केल्यास शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंना पीएमओकडून संपर्क साधण्यात आला आहे. त्यामुळे या पाच जणांची मंत्रिमंडळातील निवड निश्चित मानली जात आहे.
मॅन टू मॅन मार्किंग, मातोश्रीवर मीटिंग, केंद्रात ‘मविआ पॅटर्न’ रिपीट? पडद्याआड वेगवान घडामोडी
नितीन गडकरी नागपुरमधून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक मंत्रिपदाची जबाबदारी होती. तर पियूष गोयल उत्तर मुंबईतून विजयी झाले आहेत. मोदी सरकारमध्ये रेल्वे, वाणिज्य, अर्थ अशी महत्त्वाची मंत्रिपदं भूषवलेले गोयल यंदा पहिल्यांदाच लोकसभेवर गेले आहेत. तर रक्षा खडसे रावेरमधून सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.
PM Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; दिल्ली हाय अलर्टवर, ‘हे’ परदेशी पाहुणे राहणार उपस्थित
शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव सलग चौथ्यांदा बुलढाण्यातून निवडून आले आहेत. त्यांनादेखील पीएमओतून फोन आलेला नाही. त्यानंतर ते दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले. माजी राज्यमंत्री रामदास आठवलेंनादेखील फोन आलेला आहे. ते मोदी सरकार १ आणि मोदी सरकार २ मध्ये राज्यमंत्री राहिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभा खासदार प्रफुल पटेलांचं नाव आघाडीवर होतं. मात्र अद्याप तरी त्यांना पीएमओमधून फोन आलेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी सध्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची तासाभरापासून बैठक सुरु आहे. तिथे अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हजर आहेत. पण प्रफुल पटेल अनुपस्थित आहेत.

Source link

Narendra ModiNitin Gadkaripiyush goyalRaksha Khadseनरेंद्र मोदीनितीन गडकरीपियूष गोयलरक्षा खडसे
Comments (0)
Add Comment