Women Ministers List: नव्या सरकारमध्ये या आहेत ‘महिला ब्रिगेड’; महाराष्ट्रातून एका महिला खासदाराचा मोदी कॅबिनेटमध्ये समावेश

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज ९ जून २०२४ रोजी देशात नवे सरकार स्थापन होत आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदी सरकार ३.० मध्ये अनेक महिलांना संधी मिळणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात निर्मला सीतारमण, अनुप्रिया पटेल या महिला खासदारांना पुन्हा एकदा संधी मिळेल. याच बरोबर अन्य काही महिलांना मोदी सरकारमध्ये संधी दिली जाणार आहे. जाणून घेऊयात मोदी ३.० सरकारमध्ये कोणत्या महिला मंत्री होतील.

१) निर्मला सीतारमण: मोदींच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्रिमंडळात निर्मला सीतारमण यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. सध्या त्यांच्याकडे अर्थमंत्रालय आहे. मनमोहन सिंग यांच्यानंतर त्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत ज्यांनी अर्थमंत्री म्हणून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या मंत्री आहेत.

२) अनुप्रिया पटेल: अपना दलच्या खासदार अनुप्रिया पटेल यांना पुन्हा एकदा मोदी सरकारमध्ये स्थान मिळणार आहे. गेल्या कार्यकाळात पटेल यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्रीपद होते.

३) शोभा करदंजले: बेंगळुरू नॉर्थ मतदारसंघातील खासदार शोभा करदंजले यांना देखील मोदी ३.० मध्ये मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळणार आहे. याआधी देखील त्या मंत्री राहिल्या आहेत.

४) अन्नपूर्णा देवी: झारखंडच्या कोडरमा मतदारसंघाच्या खासदार अन्नपूर्णा देवी यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्या मोदींच्या निवासस्थानी झालेल्या संभाव्य मंत्र्यांच्या बैठकीसाठी उपस्थित होत्या.

५) रक्षा खडसे: महाराष्ट्रातील रावेरच्या खासदार रक्षा खडसे या मोदींच्या मंत्रिमंडळात खासदार असतील. रक्षा खडसे देखील संभाव्य मंत्र्यांच्या बैठकीसाठी उपस्थित होत्या.

६) निमुबेन बम्भानिया: गुजरातच्या भावनगरमधून खासदार झालेल्या निमुबेन यांना मोदी ३.० मध्ये मंत्री म्हणून संधी मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला सर्वाधिक २४० जागा मिळाल्या असून एनडीए आघाडीला ३००च्या जवळ जागा मिळाल्या आहे. देशात सलग तिसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन होत आहे. याआधी दोन वेळा भाजपकडे स्वबळावर सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ होते. यावेळी मात्र त्यांना मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे.

Source link

modi government 3.0modi government women ministers listRaksha Khadseraksha khadse from maharashtraनरेंद्र मोदीमोदी सरकार 3.0
Comments (0)
Add Comment