प्रस्ताव आला पण नितीश कुमार यांनी स्वीकारला नाही
केसी त्यागी म्हणाले की, ” ज्या लोकांनी आम्हाला प्रस्ताव दिला त्यांचे नावे उघड करणे योग्य नाही. पण असे प्रस्ताव आमच्या नेत्याकडे आले होते हे खरं आहे,आणि मी हे मोठ्या जबाबदारीने सांगत आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना नितीश कुमार यांच्याशी बोलायचे होते. परंतु आम्हाला कुठलाही प्रस्ताव स्वीकारायचा नसून एनडीएमध्ये राहायचं असं पक्षाने ठरवले आहे.”
आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी नितीश कुमार यांना दिलेल्या ऑफरबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ”आम्ही अशी कोणतीही ऑफर दिली नाही, जनतेने आम्हाला जो कौल दिला तो आम्ही स्वीकारला. काँग्रेसची कामगिरी चांगली नसलेल्या राज्यांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे, त्यातून निष्कर्ष काढून पुढील निवडणुकांच्या दृष्टीने अभ्यास केला जाईल.”
१८ खासदार मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी संध्याकाळी सव्वासात वाजता ऐतिहासिक राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधानपदाची शपथ घेतील. शपथविधीच्या या भव्य सोहळ्यासाठी ५०० सीसीटीव्ही व निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या या परिसरात तैनात असतील. राष्ट्रपती भवनाच्या याच प्रांगणात सन २०१४ आणि सन २०१९मध्येही मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मोदी यांच्यासोबत रविवारी एनडीएच्या १४ मित्रपक्षांचे किमान १८ खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यापैकी सात कॅबिनेट मंत्री आणि उर्वरित ११ स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्री असतील, असे सांगण्यात आले आहे.