दहशतवाद्यांचा बसवर हल्ला, यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत पडल्याची घटना घडली आहे. रियासी जिल्ह्यात या बसला अपघात झाला. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. त्यानंतर बसला अपघात झाला. जिल्ह्यातील शिवखोडी येथून परतत असताना कांदा झंडी मोड परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस एका खोल दरीत कोसळली. संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने ही घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोदी सरकार ३.० पर्वाला सुरुवात; नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ, मंत्रिमंडळात दिग्गजांचा समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील रियासी येथील शिवखोरी येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर रविवारी हल्ला झाला. यात्रेकरूंना घेऊन शिव खोरी मंदिराकडे निघालेल्या बसवर पोनी भागातील तेरयाथ गावात दहशतवाद्यांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात बस दरीत कोसळली आहे. यात १० यात्रेकरुंचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप मृतांचा आकडा स्पष्ट झाला नाही. या घटनेनंतर बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

बसवर मास्क घातलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर कांडा चंडी मोरजवळ ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन दरीत कोसळले. यामुळे ही दुर्देवी घटना घडली आहे. रियासीचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. बस दरीत पडल्याने १० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. संशयित दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. ही बस यात्रेकरूंना शिव खोडी मंदिरात घेऊन जात होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक वृत्तानुसार, पोनी परिसरातील तेरियाथ गावात बसवर हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले असून पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तातडीने बचावकार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत.

Source link

bus accident in ReasiReasi bus accidentReasi terrorist attackरियासी दहशतवादी हल्लारियासी बस दुर्घटनारियासी बसवर हल्ला
Comments (0)
Add Comment