आम्ही थांबतो, आमच्या मनात वेगळं काहीही नाही, दादांनी भाजपला काय सांगितलं?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्रातून त्यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण मंत्री असणार याची चर्चा सुरू असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद दिले नसल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची निराशाजनक कामगिरी पाहता त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे. याचविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (अजितदादा गट) अजित पवार यांनी भाष्य केले.

अजित पवार काय म्हणाले?

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबाबत भाजपने आमच्याशी संपर्क केला होता. परंतु युतीचे सरकार चालवित असताना त्यांनी मंत्रिपदे देण्यासाठी काही निकष लावलेले होते. त्यानुसार त्यांनी आम्हाला स्वतंत्र प्रभार देण्याचे आश्वस्त केले होते. परंतु यापूर्वी दोन वेळा कॅबिनेट मंत्रिपद भुषविलेल्या प्रफुल पटेल यांचे नाव आमच्याकडून अंतिम झाल्याने त्यांना आम्ही आता स्वतंत्र प्रभार देऊ शकत नव्हतो, अशी आमची अडचण होती.
कॅबिनेट मंत्रिपद द्या, आमचं नाव ठरलंय, भाजपकडून वेगळीच ऑफर, दादा म्हणाले- सध्या नको पण…

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह तसेच ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी आम्ही चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे विजयी झालेले आहेत. तसेच पुढील २ महिन्यांत राज्यसभेत आमचे ३ सदस्य असतील. त्यामुळे एकूण चार सदस्यांसाठी एक कॅबिनेट मंत्रिपद आम्हाला द्या, अशी मागणी आम्ही भाजपकडे केली, असे अजित पवार यांनी सांगितले.
Ajit Pawar : पक्षाला आलेले अपयश हे माझ्यामुळे, मी कमी पडलो; अजित पवारांची स्पष्टोक्ती

त्यांचीही अडचण, आमचीही अडचण!

परंतु भाजपने लावलेल्या निकषांमध्ये ते आम्हाला कॅबिनेट देऊ शकत नव्हते, ही अडचण असल्याने आम्ही यावेळी थांबतो, कोणतीही घाई नाही, ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळी आम्हाला संधी द्या, असे मीच भाजप नेतृत्वाला सांगितल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोदींच्या शपथविधीसाठी अजितदादा दिल्लीत

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) घटकपक्ष म्हणून निश्चित आम्हाला याचा आनंद आहे. आज सायंकाळी सव्वा सात वाजता मोदी शपथ घेतील. त्याच शपथविधी मी दिल्लीला आलो आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Source link

ajit pawarAjit pawar Comment on BJP OfferNarendra Modi Oath CeremonyNarendra Modi Swearing CeremonyNCP Cabinet Minister Postpraful patelनरेंद्र मोदीनरेंद्र मोदी शपथविधीराष्ट्रवादी कॅबिनेट मंत्री
Comments (0)
Add Comment