Artificial Intelligence : ‘एआय’ ची वैद्यकीय क्षेत्रात एन्ट्री, ‘या’ देशात सुरू झाले जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स रुग्णालय

बिजींग : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय ने जगभरातील तंत्रज्ञानात मोठा बदल घडवून आणला आहे. तसेच एआय मुळे खूप साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत.तंत्रज्ञानाच्या युगात अमूलाग्र बदल घडवणाऱ्या एआय ने आता वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स रुग्णालय सुरू झाले आहे.‘एजंट हॉस्पिटल’असे या रुग्णालयाचे नाव आहे. सिंघुआ विद्यापीठाच्या संशोधकांनी त्याची निर्मिती केली आहे.

१४ एआय डॉक्टरांसह ४ परिचारिका रुग्णालयात असणार

दरम्यान, या रुग्णालयात १४ एआय डॉक्टर आणि ४ परिचारिका आहेत. हे डॉक्टर दररोज ३ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहेत. या डॉक्टरांची रचना रोगांचे निदान करण्यासाठी, उपचार योजना तयार करण्यासाठी आणि परिचारिकांना दैनंदिन आधार देण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच ही प्रणाली प्रथम वैद्यकीय विद्यापीठांना मदत करण्यासाठी वापरली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मोदींच्या शपथविधीसाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित, त्या निमित्ताने जाणून घ्या कसे आहेत भारत-बांगलादेशचे मैत्रीपूर्ण संबंध ?

या वर्षाच्या अखेरीस रुग्णालय सुरू होणार

संशोधकांचे म्हणणे आहे की, हे एआय डॉक्टर जगातील कोणत्याही प्रकारच्या साथीच्या रोगाचा प्रसार आणि त्यांचे उपचार इत्यादींबाबत माहिती देऊ शकतील. ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार, एजंट हॉस्पिटलने अमेरिकन वैद्यकीय परवाना परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरे ९३.६ टक्के अचूकतेने दिली आहेत.

एजंट रुग्णालयाचे लिऊ यांग सांगतात की ,वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही या भविष्यकालीन आभासी हॉस्पिटलमधून खूप काही शिकायला मिळेल. तसेच लोकांना कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळू शकतील. त्यांच्या मदतीने अधिकाधिक लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येतील. येत्या काही दिवसांत हे रुग्णालय सुरू होणार आहे.

एआय रोबोट्स कारमध्ये भरतात इंधन

आजपर्यंत कधीच रोबोटला कारमध्ये इंधन भरताना तुम्ही पाहिलं नसेल, तुम्ही अगदी हॉलिवूड चित्रपटांमध्येही कार चालकाला इंधन भरताना पाहिलं असेल. असे अनेक देश आहेत जिथे इंधन भरण्यासाठी लोकांना कामावर ठेवले जाते. असे काही देश आहेत जिथे कारमध्ये इंधन भरण्यासाठी मानव नव्हे तर रोबोटचा वापर केला जातो. अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथील नॅशनल ऑइल कंपनीने वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स उर्फ एआयच्या मदतीने एआय रोबोट तयार केला आहे. हा एआय रोबोट इंधन स्टेशनवर अगदी सहजतेने वाहनांमध्ये इंधन भरण्यास सक्षम आहे.

Source link

Agent Hospitalartificial intelligenceGlobal TimesHealthcare Facilitymedical fieldNational Oil Companyएआय वैद्यकीय क्षेत्रबीजिंग
Comments (0)
Add Comment