फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
पॉवरफुल साऊंडसाठी कंपनी या बड्समध्ये 13 मिमी ड्रायव्हर्स देत आहे. या बड्समध्ये तुम्हाला सिग्नेचर बोट कंपनीचा साऊंड मिळेल. क्लिअर फोन कॉल्ससाठी, त्यांच्याकडे ENxTM तंत्रज्ञानासह क्वाड माइक आहेत. नवीन बड्समध्ये बीस्ट मोड देखील देण्यात आला आहे. ते 50ms ची लेटन्सी ऑफर करतात, जे त्यांना गेमिंगसाठी या सेगमेंटमधील उत्तम इयरबड बनवतात. शिवाय, बोटच्या या नवीन बड्समध्ये जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे.
कंपनीचा दावा आहे की हे बड्स एका चार्जिंगवर चार्जिंगसह 100 तासांपर्यंत प्लेबॅक टाईम देतात. विशेष म्हणजे हे बड्स ASAP टेक्नॉलोजीसह येतात. यासह, हे चार्जिंगच्या केवळ 5 मिनिटांत 100 मिनिटांपर्यंत प्लेबॅक टाईम देण्याइतपत चार्ज होतात. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.1 देण्यात आले आहे.
आऊटडोअर ऍक्टीविटीजसाठी ठरतील बेस्ट चॉइस
boAtचे हे बड्स इन्स्टंट वेक आणि पेअर टेक्नॉलोजीने सुसज्ज आहेत. हे डिवाईस खूप फास्ट पेअर होते. तसेच हे बड्स IPX5 रेटिंगसह येतात. यामुळे, वर्कआउट आणि आऊटडोअर ऍक्टीविटीजसाठी देखील ते आरामात वापरले जाऊ शकतात. तसेच, पाणी आणि घामामुळे ते लवकर खराब होणार नाहीत. या बड्सचे फिटिंग देखील चांगले देण्यात आले आहे, परंतु यात सिलिकॉन टिप नसल्यामुळे काही युजर्सना त्रास होण्याची शक्यता आहे.