bogus doctors issue: प्रशासनाचा मोठा निर्णय; बोगस डॉक्टरांकडे काम करणारेही होणार सहआरोपी

हायलाइट्स:

  • कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे.
  • त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांची एक सर्वसमावेशक यादी तयार करण्यात येणार आहे.
  • जे बोगस डॉक्टर आढळतील त्यांच्यासह त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही सहआरोपी करणार.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांची एक सर्वसमावेशक यादी तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक डॉक्टराने आरोग्य विभागाला पदवी व नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जे बोगस डॉक्टर आढळतील त्यांच्यासह त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही सहआरोपी करत गुन्हा नोंदविण्याचा आदेशच देण्यात आला आहे. (now those who work for bogus doctors will also be co accused)

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत आढावा बैठकी घेतली. आरोग्य विभागाने पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांची सर्वसमावेशक एक यादी तयार करून ह्या यादीतील डॉक्टर्सनी दिलेली कागदपत्रे अधिकृत आहेत का नाहीत त्याबाबतची तपासणी मोहीम राबवावी. त्याप्रमाणेच यादी व्यतिरिक्त असलेल्या डॉक्टरकडे अधिकृत कागदपत्रे नसतील तर त्यांच्यावर इंडियन पिनल कोड, मेडिकल प्रोहिबिशन ऍक्ट, नर्शिंग ऍक्टनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज २ हजारांवर नवे रुग्ण; मृत्यूसंख्याही घटतेय

यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अत्यंत सजगपणे बोगस डॉक्टर शोध मोहीम राबवावी व त्यांची कागदपत्रे तपासणी करून अनाधिकृतपणे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हे दाखल करावेत. तसेच अशा बोगस डॉक्टर कडे काम करणारे कर्मचारी तसेच त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषधी देणाऱ्या औषधी दुकानदारासह आरोपी करावे असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी बोगस डॉक्टरवर गुन्हे दाखल करण्यासाठी सर्व संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात केलेले आहे. तरी, या शोध मोहिमेत आपल्या कार्यक्षेत्रात एक ही बोगस डॉक्टर राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी, असे निर्देश श्री. रेखावार यांनी दिले.

क्लिक करा आणि वाचा- ‘कोणी म्हणेल सिंधुदुर्ग किल्लाही मीच बांधला’; मुख्यमंत्री- राणेंचे ‘असे’ रंगले वाकयुद्ध

या बोगस डॉक्टर शोध मोहिमेत सर्व संबंधित तहसीलदार यांनीही तालुकास्तरीय समितीला सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच, बोगस डॉक्टर वर कारवाई करत असताना बीडीओनी सोबत जावे तर पोलिस विभागाने त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या. संबंधित डॉक्टर कडे मूळ कागदपत्रे नसतील तर ते मूळ कागदपत्रे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या डॉक्टरची असून प्रशासकीय यंत्रणेची नाही, त्यामुळे ज्याच्याकडे स्वतःचे मूळ कागदपत्रे नसतील तो डॉक्टर बोगस आहे, असे गृहीत धरावे असेही श्री. रेखावार यांनी सूचित केले.

क्लिक करा आणि वाचा- ‘सिंधुदुर्गच्या विकासाचे कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव येऊ शकत नाही’

अधिकृत विद्यापीठाची पदवी नसणे तसेच बॉम्बे नर्सिंग ऍक्ट खाली नोंदणी नसलेले डॉक्टर हे बोगस डॉक्टर असल्याची माहिती डॉ. लांब यांनी दिली. आयुर्वेदिक, होमियोपॅथी, डेंटल व ऑलोपॅथी डॉक्टरांना वैद्यकीय पदवी व अधिकृत नोंदणी आवश्यक आहे. तसेच, जिल्ह्यात दिनांक १५ मार्च २०२१ ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत बोगस डॉक्टर बाबतच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राधानगरी, करवीर व भुदरगड या तीन तालुक्यातून प्रत्येकी एक तक्रार प्राप्त असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

Source link

bogus doctorscollectorKolhapurrahul rekhawarकोल्हापूरबोगस डॉक्टरराहुल रेखावार
Comments (0)
Add Comment