Tuesday Remedies :
हिंदू धर्मात प्रत्येक आठवड्याचा दिवस कोणत्या ना कोणत्या तरी देवाला समर्पित आहे. मंगळवारचा दिवस हनुमानाला समर्पित करण्यात आला आहे. हिंदू धर्मात मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याची प्रथा आहे.
या दिवशी भगवान श्री राम भक्त हनुमानाची विशेष पूजा केली जाते. तसेच या दिवशी व्रत देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नियमितपणे पूजा आणि उपवास केल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होतो. ज्योतिषशास्त्रात मंगळवारी काही विशेष उपाय सांगितले आहे. या दिवशी काही उपाय केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात. जाणून घेऊया या उपायांबद्दल
मंगळवारी करा हे ६ उपाय
1. हनुमानाची पूजा
मंगळवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करुन लाल वस्त्र परिधान करा. त्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर, चमेलीचे तेल आणि लाल फुले अर्पण करा. यासोबतच या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करावे. असे मानले जाते भगवान हनुमान तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
2. मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला अधिक मजबूत बनवण्यासाठी मंगळवारी तांब्याचे भांडे पाण्याने भरुन त्यात कुंकू आणि गूळ टाका. त्यानंतर हे पाणी सूर्यदेवाला अर्पण करावे. असे नियमितपणे केल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होतो.
3. धनप्राप्तीसाठी करा हे उपाय
मंगळवारी हनुमानाला लाल वस्त्र, फळे, लाल फुले आणि बुंदीचे लाडू अर्पण करा. त्यानंतर हनुमानाची आरती करुन धनाची प्रार्थना करावी. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
4. शत्रूंचा त्रास दूर करण्याचे उपाय
मंगळवारी लाल चंदनाची माळ घालून हनुमान चालीसाचे पठण करा. तुमचे रक्षण करण्यासाठी हनुमानाजवळ प्रार्थना करा. असे केल्याने नकारात्मक गोष्टी दूर होतील, तसेच शत्रूपासून सुटका होईल.
5. चांगल्या आरोग्यासाठी करा हे उपाय
मंगळवारी हनुमानाला लाल शेंदूर अर्पण करा तसेच हनुमान चालिसाचे पठण करा. यानंतर तुमच्या आरोग्यासाठी हनुमानाजवळ प्रार्थना करा.
6. नोकरी मिळवण्यासाठी उपाय
मंगळवारी हनुमानाला गूळ आणि हरभरा अर्पण करा. त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा. असे केल्याने नोकरी शोधणाऱ्यांना लवकरच नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.