नवी दिल्ली: देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर आलं आहे. रविवारी राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी ७१ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या मागे एक प्राणी फिरताना दिसत आहे. हा प्राणी काही सेकंद राष्ट्रपती भवनात दिसतो. व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख असलेल्या राष्ट्रपती भवनात प्राणी नेमका आला कुठून? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
नरेंद्र मोदी यांच्यानंतर एक एक मंत्री शपथ घेत होता. भाजप खासदार दुर्गा दास उईके यांनी शपथ घेतली, तेव्हा व्यासपीठाच्या मागे राष्ट्रपती भवनाच्या इमारतीत एक प्राणी दिसला. यासोबतच जेव्हा खासदार अजय टमटा शपथ घेत होते, तेव्हादेखील या प्राण्याची झलक दिसली. शपथविधी सोहळा सुरु असताना कोणाचीही नजर प्राण्यावर गेली नाही. तिथे प्राणी असल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. नंतर व्हिडीओ समोर आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

व्हिडीओतील प्राण्याला पाहून प्रत्येक जण अंदाज बांधत आहे. कोणाला हा प्राणी पाळीव बिबट्या वाटतोय, तर कोणाला ती मांजर वाटतंय, जिची सावली मोठी आहे. राष्ट्रपती भवनात कडेकोट सुरक्षा असते. अशा ठिकाणी प्राण्याला पाहून सगळेच चकित झाले. तो नेमका कोणता प्राणी होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियात जोरात सुरु आहे. तो प्राणी नेमका कोणता, याचा अंदाज अनेकांकडून बांधला जातोय.