जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल; पाहा, कोणत्या पक्षाला किती जागा!

हायलाइट्स:

  • जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपचे सर्वपक्षीय पॅनल.
  • भाजप व राष्ट्रवादी प्रत्येकी ७ जागांवर लढणार आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला ५ तर काँग्रेसला २ जागा.
  • सर्वपक्षीय पॅनल बाबत अधिकृत घोषणा रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील करणार.

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी(District bank election) शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) व भाजपचे (BJP) सर्वपक्षीय पॅनलवर शिक्कमोर्तब झाला असून, भाजप व राष्ट्रवादी प्रत्येकी ७ जागांवर लढणार आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला ५ तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. सर्वपक्षीय पॅनल बाबत अधिकृत घोषणा रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे करणार आहेत. (all party panel of shiv sena ncp congress and bjp for the election of jalgaon district central co operative bank)

जिल्हा बँकेचा पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल बाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय पॅनलच्या समिती सदस्यांची बैठक शनिवारी विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, आ. चिमणराव पाटील, आ. सुरेश भोळे, आ. शिरिष चौधरी, गुलाबराव देवकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, अॅड. संदीप पाटील असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- परतीच्या पावसाचा तडाखा; वीज कोसळल्याने एक शेतकरी ठार, तर दोन जखमी

आजची सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपल्यानतंर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांना माहीती देतांना सर्व नेत्यांनी चर्चा केल्यानतंर जागा वाटपाचे ठरले सूत्र ठरले असल्याचे सांगीतले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपला प्रत्येकी ७, शिवसेनेला ५ तर काँग्रेसला २ जागा मिळणार असल्याची माहीती त्यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा- प्रशासनाचा मोठा निर्णय; बोगस डॉक्टरांकडे काम करणारेही होणार सहआरोपी

आज झालेल्या बैठकीच्या चर्चेची माहीती तसेच जागावाटपाचे सुत्र याबाबत सर्वपक्षीय नेते आपल्या पक्षातील वरिष्ठांना माहीती देतील. त्यामुळे याबाबतची अधिकृत घोषणा उद्या करणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले. सर्वपक्षीय पॅनल व जागा वाटपाबाबत उद्या चारही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय जाहीर झाल्यानतंरच पुढील प्रकीया होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘कोणी म्हणेल सिंधुदुर्ग किल्लाही मीच बांधला’; मुख्यमंत्री- राणेंचे ‘असे’ रंगले वाकयुद्ध

Source link

all party panelbjpCongressdistrict bank electionGulabrao Patilncpshiv senaगुलाबराव पाटीलजिल्हा बँक निवडणूकसर्वपक्षीय पॅनल
Comments (0)
Add Comment