Samsung Galaxy Watch FEची अंदाजित किंमत
Samsungच्या या डिवाइसमध्ये, “FE” म्हणजे फॅन एडिशन, जे सॅमसंगने आपल्या चाहत्यांसाठी खास ऑफर केले आहे. सॅमसंग गॅलेक्सी वॉच लाइनअपमध्ये FE एडिशन रिलीज होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील लीकवरून असे दिसून आले आहे की Samsung Galaxy Watch FE तीन रंगांच्या ऑप्शन्समध्ये येण्याची शक्यता आहे जसे की, ब्लॅक, सिल्वर आणि पिंक गोल्ड. Samsung Galaxy Watch FE ची किंमत 199 युरो (अंदाजे 17,951 रुपये) इतकी आहे.
Samsungच्या या स्मार्टवॉचमध्ये हे असतील स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Watch FE हे एक एंट्री-लेव्हल वेअरेबल असण्याची अपेक्षा आहे, Galaxy Watch FE मध्ये सेल्युलर डेटा व्हेरियंट Galaxy Watch 4 सारखे फिचर असण्याची अफवा आहे. स्मार्टवॉचमध्ये 396 x 396 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.2-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. यात 1.5GB रॅम आणि 16GB स्टोरेज असेल. या स्मार्टवॉचमध्ये Exynos W920 ड्युअल-कोर 1.18GHz प्रोसेसर असू शकतो. हे स्मार्टवॉच 247mAh बॅटरीसह सुमारे 30 तास चालेल अशी अपेक्षा आहे. आगामी स्मार्टवॉच सॅमसंग वन यूआय वॉच 5.0 वर आधारित असण्याची अपेक्षा आहे. सेन्सर्सच्या बाबतीत, गॅलेक्सी वॉच एफई एक्सीलरोमीटर, बॅरोमीटर, बायोइम्पेडन्स ऍनालीसिस, ईसीजी सेन्सर, जायरोस्कोप, जिओमॅग्नेटिक सेन्सर, ब्राइटनेस सेन्सर आणि हॉर्ट रेट (ऑप्टिकल)ने सुसज्ज असू शकते.