गाडी चालवतांना व्लॉग रेकॉर्ड करत असाल तर सावधान! राज्य सरकार करणार कठोर कारवाई

तुम्ही कार चालवताना व्लॉग किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल तर काळजी घ्या. कार व्लॉगिंगविरोधात केरळ उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने केरळच्या मोटार वाहन विभागाला आदेश दिले आहेत की जर कोणी वाहनाच्या चालकाच्या केबिनमध्ये व्लॉगिंग करताना आढळले तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात व किंवा मोठा दंड आकारला जावा. तसेच, ड्रायव्हरच्या केबिनच्या शेजारील सीटवर एखादी व्यक्ती व्लॉगिंग करताना आढळल्यास, अशा प्रकरणात ड्रायव्हरला दंड आकारण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

दंड ठोठावण्याचे राज्य सरकारला आदेश

सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकाला रील्स आणि व्लॉग बनवण्याची आवड निर्माण झाली आहे. मात्र केरळ उच्च न्यायालयाने या याबाबतीत गांभीर्य दाखवले आहे. LiveLaw च्या रिपोर्टनुसार, उच्च न्यायालयाच्या निर्णयात असे म्हटले आहे की जर चालक केबिनमध्ये रेकॉर्डिंग किंवा व्लॉगिंग करताना आढळला तर त्याला मोठा दंड ठोठावला जाईल किंवा चालान जारी केले जाईल. याशिवाय हायकोर्टाने वाहन विभागाला हेवी मॉडिफाईड गाड्यांचे चलन जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने म्हटले की, अनधिकृत लाइट्स आणि आफ्टरमार्केट एक्झॉस्ट सिस्टीम यासारखे बदल बेकायदेशीर आहेत आणि अशी वाहने AIS 008 च्या सुरक्षा गाईडलाइन्सचे उल्लंघन करतात. याशिवाय यामुळे प्रदूषणही वाढते. गाड्यांवर बेकायदेशीर फेरफार करण्याबरोबरच बसेसवर अनधिकृत एलईडी लाईट्स आढळल्यास दंडही आकारण्यात येणार आहे.

तर..चालकाचे लाइसेन्स होणार रद्द

रस्त्यावर चालणारी वाहने, स्टेज कॅरेज, अवजड मालवाहू वाहने किंवा इतर वाहनांच्या ड्राईव्ह केबिनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा व्लॉगिंग करणे धोकादायक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे चालकाचे लक्ष विचलित होऊन मोठा अपघात होऊ शकतो. कार चालकासह अन्य कोणी व्लॉगिंग करताना आढळल्यास चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मोटार वाहन विभाग मोटार वाहन कायद्याच्या कलम 190 (2) अंतर्गत यासाठी कारवाई करू शकतो. ज्या अंतर्गत चालकाचे लाइसेन्स रद्द देखील केले जाऊ शकते.

ज्या वाहनांमध्ये जास्त मॉडिफिकेशन करण्यात आले आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी यूट्यूबवरून व्हिडिओ स्कॅन करण्यास न्यायालयाने एनफोर्समेंट डिपार्टमेंटला सांगितले आहे. याशिवाय अशा वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Source link

car drivingcar vlogging heavy finescar vlogging in keralaKerala High Courtkerala high court bans car vloggingtraffic rulesvlog recordकेरळ उच्च न्यायालय
Comments (0)
Add Comment