Fact Check : चंद्रशेखर आझाद आणि मौलाना अर्शद मदनी यांच्यात गळाभेट? फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघातून आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) उमेदवार चंद्रशेखर हे विजयी झाले आहेत. या दरम्यान, त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ते जमियत उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांना मिठी मारताना दिसत आहेत. नवनियुक्त खासदार चंद्रशेखर आझाद अर्शद मदनी यांच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत, असा दावा फोटो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडत फोटो शेअर केला जात आहे.

विश्वास न्यूजच्या पडताळणीत सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचं म्हटलं आहे. चंद्रशेखर आझाद आणि मौलाना अरशद मदनी यांच्या आता व्हायरल होणारा फोटो २०१८ चा आहे. जुना फोटो आता लोकसभा २०२४ शी जोडून व्हायरल केला जात आहे.

Fact Check : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ९८ मुस्लिम उमेदवार खासदार? व्हायरल मेसेजचं सत्य काय?

व्हायरल पोस्टमध्ये काय केला जातोय दावा?

फेसबुक युजरने व्हायरल पोस्ट शेअर करत लिहिलंय, ‘भीम आर्मीचे प्रमुख आणि नवनियुक्त खासदार चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी दारूल उलूम देवबंद पोहोचत हजरत मौलाना सय्यद मौलाना अर्शद मदनी एसबी यांच्याकडून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून घेतला. मुस्लिमांना हा तरुण आवडतो कारण तो नेहमीच दुःखात उभा राहतो. आणि आजही एका विद्वानाकडे मागितला आहे.’

पोस्टची अर्काइव लिंक

पडताळणीत काय समोर आलं?

विश्वास न्यूजने सर्वात आधी या व्हायरल फोटोची पडताळणी करताना, गुगल लेन्सद्वारे व्हायरल फोटो सर्च केला. सर्च दरम्यान, हा फोटो १९ सप्टेंबर २०१८ रोजी नवभारत टाइम्स डॉट इंडिया टाइम्सच्या वेबसाइटवर अपलोड केलेल आढळला. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘भीम आर्मी आता देशात आपली सामाजिक व्याप्ती वाढवण्याच्या तयारीत आहे. यावेळी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मंगळवारी देवबंद इथे पोहोचून मौलाना अर्शद मदनी यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. मदनी आणि चंद्रशेखर यांनी भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. या भेटीला औपचारिक भेटीचं नाव दिलं जात आहे.’

याच भेटीचा फोटो विश्वास न्यूजला वन इंडिया वेबसाइटवर मिळाला. १९ सप्टेंबर २०१८ च्या बातमीनुसार, ‘तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. चंद्रशेखर यांनी मंगळवारी देवबंदमध्ये जमियत उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास २० मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली’

व्हायरल पोस्टशी संबंधित पोस्टबाबतच्या पडताळणीसाठी, विश्वास न्यूजने आझाद समाज पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या साजिद अली चौधरी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यावेळी त्यांनी हा फोटो २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात आल्याची माहिती दिली.

ही दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक पेजचं सोशल स्कॅनिंग केलं. त्यावेळी या पेजला २० हजार लोक फॉलो करत असल्याचं आढळलं.

निष्कर्ष

विश्वास न्यूजला आपल्या पडताळणीत व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचं आढळलं आहे. चंद्रशेखर आझाद आणि मौलाना अर्शद मदनी यांचा हा फोटो २०१८ चा असून जुना फोटो लोकसभा २०२४ शी जोडून व्हायरल केला जात आहे.

(This story was originally published by vishvasnews, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

arshad madaniChandrashekhar Azadchandrashekhar azad hugging arshad madani viral photofact check newsअर्शद मदनीचंद्रशेखर आझादफॅक्ट चेक
Comments (0)
Add Comment