भावाचा मृत्यू, बहिणीनं लिंग बदललं; लग्नाच्या पैशातून शस्त्रक्रिया, कारण वाचून डोळे पाणावतील

लखनऊ : एका युवतीने आपल्या भावाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आधार देण्यासाठी लिंग परिवर्तन केले आहे. शालिनी नामक तरुणीने मुलगा बनण्याचं धाडस केले. खूप वर्षांपासून लिंग परिवर्तनाच्या विचारात असणाऱ्या शालिनीला मात्र आधी घरच्यांचा विरोध पत्करावा लागला. परंतु अखेर तिने वैद्यकीय चाचण्या पूर्ण करुन लिंग परिवर्तन केले.

उत्तर प्रदेशच्या इटावा येथील थाना फ्रेंड्स कॉलनी येथे राहणाऱ्या शालिनीला जेंडर डिस्फोरियामुळे आधीपासूनच मुलांसारखं राहण्याची आवड होतीच. पण मोठ्या भावाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने घरचा कर्ता पुरुष तिच्या कुटुंबाने गमावला होता. अशा परिस्थितीत भावाच्या पश्चात कुटुंबाला आधार देण्यासाठी देखील तिने हे धाडसी पाऊल उचलले.

लिंग परिवर्तनानंतर शानूने सांगितले की, या लिंग परिवर्तनाच्या प्रक्रियेत अनेक टप्पे पार करावे लागतात. दोन वर्ष आधी मी हार्मोन थेरपी केली होती, त्यानंतर स्तन काढण्यात आले आणि आता गुप्तांग सु्द्धा विकसित केला जात आहे. यामध्ये लाखोंचा खर्च आला आहे. माझ्या लग्नाचे पैसे मी या सर्जरीसाठी खर्च केले आहेत कारण मला लग्न करायचंच नव्हतं.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार तुरुंगातून देणार पेपर; हायकोर्टाची परवानगी, परीक्षा कोणती?
लिंग बदलण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नाच्या उत्तरात शानू आपल्या भावना व्यक्त करत म्हणाला, त्याचे वडील होमगार्ड म्हणून काम करतात. कुटुंबात तीन बहिणी आहेत आणि एक मोठा भाऊ होता. २०१९ मध्ये भावाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचे आई-वडील नैराश्यात गेले. अशा परिस्थितीत शालिनीने स्वतःला मुलामध्ये बदलण्याचा निर्णय घेतला. सध्या उर्वरित दोन बहिणी विवाहित आहेत. शालिनीला स्वतःला लग्न करायचे नव्हते, म्हणून तिने आपल्या मोठ्या भावाच्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि तिच्या पालकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी, ती लिंग बदलून मुलीपासून मुलगा झाला.

वैद्यकीय शस्त्रक्रियेबद्दल माहिती देताना शानूने सांगितले की, लहानपणापासूनच त्याला मुलांसारखे जगणे आवडते. शर्ट-पँट घालणे असो किंवा त्यांच्यासोबत खेळणे, सर्व कामे मुलांसारखेच करत होतो. माझ्या मनात मुलगा होण्याची तीव्र इच्छा होती, पण मला माझ्या घरच्यांची मान्यता आधी मिळाली नाही. मात्र, माझ्या भावाच्या मृत्यूनंतर मी घरच्यांना समजावून सांगितले आणि विचाराअंती मला होकार दिला.
Nagpur Crime: गाडी वेगात चालवण्यावरून वाद, मेव्हण्याने मित्रांना बोलवलं, रागात भाऊजींनाच संपवलं
शानूच्या म्हणण्यानुसार त्याने शस्त्रक्रियेसाठी इंदूर आणि दिल्लीतील डॉक्टरांशी संपर्क साधला. शस्त्रक्रियेसाठी खूप खर्च करावा लागणार होता. या परिस्थिती जाणून शानूने कुटुंबीयांना मला लग्नच करायचे नाही असे सांगितले. माझ्या लग्नात जो काही खर्च होईल तो शस्त्रक्रियेवर खर्च करा असे सुचवले. लिंग परिवर्तनाच्या या शस्त्रक्रियेत सर्वप्रथम हार्मोन थेरपी करण्यात आली नंतर स्तन आणि गर्भाशय काढण्यात आले आणि आता गुप्तांग देखील विकसित करण्याची तयारी सुरू आहे.

आता शानू्च्या शरीरात मुलांप्रमाणेच बदल जाणवू लागले आहेत. आवाजातही बदल झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शानू आता पूर्णपणे निरोगी आहे. आई-वडिलांना नैराश्यातून बाहेर काढण्यातही तो यशस्वी ठरला आहे. मोठ्या भावाच्या निधनानंतर शानू कुटुंबातील कर्त्याची जबाबदारी पार पाडत आहे. तसेच आता सर्व कागदपत्रांमधील नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Source link

gender changegender change oprerationgender dysphoriagirl became boyuttarpradeshउत्तरप्रदेश बातमीमुलीचा धाडसी निर्णयलिंग परिवर्तनलिंग परिवर्तनाची शस्त्रक्रियासामाजिक बदल
Comments (0)
Add Comment