Lord Hanuman :
ज्येष्ठ महिन्यातील मंगळवार हा विशेष मानला जातो. या दिवळी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. हनुमानाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होऊन अनेक मनोकामना पूर्ण होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर भगवान हनुमानाची नेहमी कृपा असते. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच शत्रूपासून मुक्ती मिळते. अनेक ग्रहाचा शुभ प्रभावही या राशींवर राहातो. या राशींसाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. जाणून घेऊया कोणत्या राशींवर हनुमानाची विशेष कृपा असते.
1. मेष राशी
मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होती. मेष राशीच्या लोकांनी हनुमानाची योग्य प्रकारे पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात. हनुमानाच्या कृपेने या राशींना सौभाग्य प्राप्त होते. आर्थिक समस्याही दूर होतात. मेष राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागतो. तसेच पूजा केल्याने सुख-समृद्धी राहते.
2. कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांवर हनुमानाचा विशेष आशीर्वाद असतो. कर्क राशीच्या लोकांनी हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. कधीही पैशांची कमतरता भासत नाही. या राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये काम करण्यापूर्वी हनुमानाचे ध्यान करावे. असे केल्याने चांगली प्रगती होते. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मिळतात.
3. वृश्चिक राशी
वृश्चिक रास ही मंगळाच्या राशींपैकी एक आहे. वृश्चिक राशीचे लोक हनुमानच्या कृपेने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उंची गाठतात. यांना आर्थिक लाभाच्या संधी मिळतात. जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर मंगळवारी हनुमानाचे व्रत करा. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील.
4. मकर राशी
मकर राशी ही मंगळ ग्रहाची उच्च राशी आहे. या राशीच्या लोकांवर हनुमानाचा आशीर्वाद कायम असतो. जीवनात अनेक संकटे आणि अडथळे येत असतील तर हनुमानाची पूजा अवश्य करावी. असे केल्याने चांगल्या संधी मिळतात. तसेच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. तुमचे जीवन सुधारण्यासाठी किंवा कोणताही निर्णय घेण्यासाठी हनुमानाचे ध्यान करा, असे केल्याने शुभ फले मिळतील.
5. हनुमानाची पूजा करताना हे नियम लक्षात ठेवा
- मंगळवारी तामसिक पदार्थांचे सेवन करु नका.
- मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात किंवा माकडाला गूळ, हरभरा, केळी किंवा शेंगदाणे खाऊ घाला.
- दररोज हनुमान चालिसा म्हणा तसेच मंगळवारी सुंदरकांडचे पठण करा.
- मंगळवारी गरीब आणि गरजूंना अन्नदान करा.
- हनुमानाला केवडा, अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करा.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.